महादेव जानकर यांच्यासाठी नरेंद्र मोदींचा संदेश घेऊन आलो आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीच्या सभेत दिला शब्द

| Published : Apr 01 2024, 05:46 PM IST

महादेव जानकर
महादेव जानकर यांच्यासाठी नरेंद्र मोदींचा संदेश घेऊन आलो आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीच्या सभेत दिला शब्द
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जाणकार यांनी आज परभणीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.यानिमित्त परभणीत महायुतीकडून सभेचं आयोजन करण्यात आलं होत

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जाणकार यांनी आज परभणीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.यानिमित्त परभणीत महायुतीकडून सभेचं आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर यांचं कौतुक केलं. 

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. त्यांनी म्हटलं की, "“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला विचारलं निवडणुकीचं सगळं ठीक चालू आहे का? आम्ही त्यांना सांगितलं हो चांगलं चालू आहे. आता तुम्ही इथून गेल्यानंतर आम्ही परभणीला चाललो आहोत. महादेव जानकर यांचा अर्ज भरण्याकरता जात आहोत. तेव्हा मोदी म्हणाले, जानकरांना सांगा की, अठराव्या लोकसभेसाठी मी त्यांची वाट पाहत आहे. तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे. माझ्याकडून परभमीच्या नागरिकांना बोला की, तुमच्यासाठी जानकारांना पाठवलं आहे. त्यांना सकुशल दिल्लीला पाठवा. मोदींचा संदेश तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे.”

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जाणकर यांचे कौतुक केलं आहे. तसेच महायुतीचे गठबंधन तयार करण्यात आले, मागील निवडणुकीत महाराष्ट्राने 41 खासदार महायुतीला देण्यात आले होते. नरेंद्र मोदी यांच्यासोबत महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार पाठवण्यात येणार असून पंकजा मुंडे यांचा खासदारांमध्ये समावेश असणार आहे. 
आणखी वाचा - 
अबकारी धोरण प्रकरण : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी
अजय देवगणमुळे सहकलाकाराच्या पत्नीने उचलले होते आत्महत्येचे पाऊल, नेमकं काय होत प्रकरण?