अजय देवगणमुळे सहकलाकाराच्या पत्नीने उचलले होते आत्महत्येचे पाऊल, नेमकं काय होत प्रकरण?

| Published : Apr 01 2024, 11:49 AM IST

Ajay Devgan  NY Cinemas

सार

बॉलिवूडचा एक्शन स्टार अजय देवगण हा कायमच चर्चेत राहत असतो, तसाच तो आता परत एकदा सर्वांच्या चर्चेत आला आहे. अजय देवगणला एक मस्करी अशीच महागात पडल्याचे दिसून आले आहे.

बॉलिवूडचा एक्शन स्टार अजय देवगण हा कायमच चर्चेत राहत असतो, तसाच तो आता परत एकदा सर्वांच्या चर्चेत आला आहे. अजय देवगणला एक मस्करी अशीच महागात पडल्याचे दिसून आले आहे. त्याच्या सहकलाकाराच्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे. अजय देवगण हा अनेकदा त्याच्या सोबत असलेल्या सह कलाकारांची मस्करी करताना दिसतो. 

त्याने मिडडेला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. अजय देवगण सोबत एक सह कलाकार काम करत होता. त्याची पत्नी छोट्या शहरातील होती आणि तिला मस्करी केलेलं समजत नसायचं. यावेळी अजयने तिला तुझ्या पतीचं बाहेर अफेअर असल्याचं सांगितलं आणि तिने ते मनाला लावून घेतलं. रात्री कोणतीही शूटिंग चालू नसून तो प्रेमप्रकरण करत असल्याचं म्हटलं होत. 

अजय देवगनला मस्करीने टाकले होते टेन्शनमध्ये 
अजय देवगणने सांगितले की, त्याच्यासोबत काम करणारा सहकलाकार छोट्या शहरातील होता. तो कामावर येत असताना त्याची पत्नी सोबत राहायला आली होती. ती रोज सकाळी त्याला भेटायला यायची आणि रात्री त्याला शूटिंग नव्हती. अशावेळी मी रात्री तो दुसरीकडे जात असून त्याचे अफेअर चालू आहे असे त्याच्या पत्नीला सांगितले आणि तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. 

सह कलाकाराच्या पत्नीकडून आत्महत्या करण्याचा केला होता प्रयत्न 
त्या सह कलाकाराच्या पत्नीने माझ्या मस्करीकडे दुर्लक्ष केले होते. तिला मी बोलतोय ते खरे आहे असं वाटतं नव्हते. पण त्या दोघांमध्ये वाद होत असल्याचे मला माहित झाले. एक दिवस अचानक तिने अतिप्रमाणात गोळ्या खाल्या आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे नंतर त्या दोघांमध्येच वाद असून त्यामुळेच हे झाल्याचं मला समजलं. 
आणखी वाचा - 
'निवडणुकीत विजय झाल्यास व्हिस्की अन् बिअर देणार...',चिमूरच्या वनिता राऊत यांचे मतदारांना विचित्र आश्वासन
गोविंदाचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश ; उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार का ?