हैदराबादमधील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात एका व्यक्तीने नवीन BMW कार घेतल्यानंतर तृतीयपंथीयांच्या एका गटाने त्याच्याकडे तब्बल २ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

मुंबई : सोशल मीडियावर सध्या हैदराबादमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये बीएमडब्लू कारच्या एका मालकाला तृतीयपंथीयांचा एक गट त्रास देत असल्याचं दिसतंय. रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीने नवीन कार घेतल्यानंतर काही वेळातच हा गट तिथे पोहोचला आणि त्यांनी मालकाकडे तब्बल २ लाख रुपयांची मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, BMW मालकाकडे या गटाने २ लाख रुपये मागितले. ही मागणी नेमकी कोणत्या परिस्थितीत केली गेली आणि मालकाने पैसे दिले की नाही, याबाबत तात्काळ कोणतीही स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही.

ही घटना अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वीच तेलंगणाचे पोलीस महासंचालक (DGP) सी. व्ही. आनंद यांनी पोलिसांकडून एक विशेष मोहीम राबवली जाईल, असं जाहीर केलं होतं. तृतीयपंथी गटांकडून होणारी कथित वसुली आणि भिक मागण्याच्या रॅकेटच्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी ही मोहीम असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याआधीही हैदराबादमध्ये अशाच तक्रारींनंतर पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती.

व्हायरल व्हिडिओ पाहा

Scroll to load tweet…

गेल्या काही दिवसांपासून अनेक लोकांनी अशा प्रकारच्या तक्रारी केल्या आहेत. नवीन गाडी घेतल्यानंतर, घरभरणीच्या कार्यक्रमावेळी किंवा इतर शुभ प्रसंगी अशा प्रकारे त्रास देऊन पैशांची मागणी केली जात असल्याचे प्रकार वाढले आहेत.

हैदराबाद पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, आर्थिक फायद्यासाठी लोकांना त्रास देणाऱ्या किंवा अडवणूक करणाऱ्या कोणावरही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. पोलिसांनी हेही नमूद केलं की, जर कोणी स्वतःच्या इच्छेने पैसे देत असेल तर ते बेकायदेशीर नाही, पण कोणालाही पैसे देण्यासाठी जबरदस्ती करणे किंवा त्रास देणे अजिबात स्वीकारार्ह नाही.