Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुक 2024 भाजपमध्ये हालचालींना वेग! पंतप्रधान मोदींच्या मिशन 370 वर लक्ष केंद्रित

| Published : Feb 25 2024, 10:31 AM IST / Updated: Mar 21 2024, 05:51 PM IST

JP NADDDA

सार

लोकसभा निवडणुकीत भाजपने 370 जागांचे लक्ष्य दिले आहे. त्यासंदर्भातील बैठकींचे सत्र दिल्लीत सुरु झाले आहे. 

Loksabha Election 2024 : पुढील काही महिन्यांत देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या संदर्भात देशातील सर्वात प्रमुख पक्ष भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी नवी दिल्लीतील भाजपच्या (BJP) मुख्यालयात एकामागोमाग एक बैठका पार पडल्या. निवडणूक आयोग पुढील महिन्यात म्हणजेच 13 मार्चनंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाचे पथकही यासंदर्भात विविध राज्यांचा दौरा करत आहे.

शनिवार (24 फेब्रुवारी) रोजी भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. त्यामध्ये विविध राज्यांचे प्रभारी सहभागी झाले होते. बैजयंत पांडा (यूपी), दुष्यंत गौतम (उत्तराखंड), तरुण चुघ (जम्मू आणि काश्मीर), विनोद तावडे (बिहार) आणि बिप्लब देब (हरियाणा) या बैठकीला उपस्थित होते. या सर्वांकडून विविध राज्यात सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराच्या तयारीबाबत अहवाल मागविण्यात आला होता.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची लवकरच बैठक होणार -
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक लवकरच होणार असून त्यानंतर भाजप उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. यावेळी भाजपचे लक्ष्य 400 हून अधिक जागा जिंकण्याचे आहे. यासाठी त्यांना निवडणुकीच्या तयारीत कोणतीही चूक करायची नाही. भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) 370 जागा एकट्याने लढवण्याची तयारी करत आहे. तर 2019 मध्ये भाजपने ज्या 436 जागांवर निवडणूक लढवली होती त्यापैकी 303 जागा जिंकल्या होत्या.

भाजपचे लक्ष्य 370 जागा- 
शनिवारी झालेल्या बैठकीचा मुख्य अजेंडा लक्ष्य 370 जागा हा होता. ज्या भागात पक्षाची स्थिती कमकुवत आहे, त्या ठिकाणी पक्ष मजबूत करण्याबाबत चर्चा करण्याचा निर्णय भाजपने बैठकीत घेतला. यापूर्वी, मध्य प्रदेशातील एका सभेत पंतप्रधान मोदींनी (Prime Minsiter Narendra Modi) अलीकडेच 370 जागा मिळवण्याचा 'जादुई फॉर्म्युला' वर्णन केला होता. ते म्हणाले की, भाजप बूथ कार्यकर्त्यांना प्रत्येक बूथवर जास्तीत जास्त मते पडतील याची खात्री करावी लागेल आणि त्यामुळे भाजप 370 जागांवर पोहोचेल.

भाजपचे लक्ष उत्तर प्रदेशवर -
भाजप पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशातील नेत्यांची स्वतंत्र बैठक घेतली तेथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने यूपीमध्ये 80 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्यांचे लक्ष्य 62 पेक्षा जास्त आहे. विरोधी पक्षाबद्दल बोलायचे झाले तर यावेळी उत्तर प्रदेशमधून समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र लढणार असून त्यांनी जागावाटपाची घोषणा आधीच केली आहे. एकीकडे समाजवादी पक्ष 63 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर काँग्रेस 17 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे.

आणखी वाचा - 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुलाला जीवे मारण्याची धमकी, पुण्यातून 19 वर्षीय तरुणाला अटक
Maratha Reservation : "मराठा समाजाला आरक्षण दिलेय, आता आंदोलन करण्याचा हट्ट थांबवावा", देवेंद्र फडवणीस यांचे मनोज जरांगेंना आवाहन
Maharashtra Bhushan Puraskar : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 प्रदान

Read more Articles on