सार
Maharashtra Bhushan Puraskar : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला आहे.
Maharashtra Bhushan Puraskar : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते अशोक सराफ यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अशोक सराफ यांच्या मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार
“आपल्या अविस्मरणीय भूमिकांनी अष्टपैलू असणाऱ्या अशोक सराफ यांनी प्रेक्षकांची अभिरुची संपन्न केली. अवघ्या महाराष्ट्राला त्यांनी पोट धरून हसवले. प्रसिद्धीचे इतके वलय मिळूनही त्यांनी कधीही जमीनीशी नाते तोडले नाही. खऱ्या अर्थाने ते मराठी मातीतील अस्सल हिरा आहेत”, अशा भाषेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या कार्याचा गौरव केला. मराठी चित्रपटसृष्टीसाठी (Marathi Film Industry) जे-जे आवश्यक आहे, त्या सर्व सुविधा राज्यामध्ये उपलब्ध करून देण्याचा आणि जगाला हेवा वाटेल अशी फिल्मसिटी (Film City) आपण तयार करू, असेही विधान यावेळेस मुख्यमंत्री शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी केले.
या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर अन्य मान्यवरही उपस्थिती होते.
अमृताहूनही गोड क्षण - मुख्यमंत्री शिंदे
“अष्टपैलू (versatile) हा शब्द ज्याला खऱ्या अर्थाने ज्यांना लागू होतो ते नाव म्हणजे अशोक सराफ (Ashok Saraf) आहे. सलग 50 वर्षे असंख्य भूमिका करूनही ज्यांच्यामध्ये अभिनयाची आणि नवे काही तरी करून दाखवण्याची त्यांची भूक अजूनही कायम आहे. अशोक सराफ हे वयाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देण्यात येतोय, हा अवघ्या महाराष्ट्रासाठी केवळ अभिमानाचाच नाही तर अमृताहूनही गोड क्षण असल्याचे त्यांनी सांगितले”, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
अशोक सराफ हे मराठी चित्रपटाचा चेहरा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आजचा दिवस सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. चित्रपट पुरस्कारांचा बॅकलॉग भरून काढला. आज आपले कलाविश्व समृद्ध करणारे अनेक मोठे कलावंत येथे आहेत. चित्रपटसृष्टीला आणि आपल्या जीवनाला समृद्ध करणारी ही मंडळी आहेत. अशोक सराफ यावर्षी 75 वर्षाचे झाले आहेत. त्यांच्या अमृत महोत्सवात आपण त्यांना महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) देत आहोत. मराठी चित्रपटाचा चेहरा हे अशोक सराफ आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुढे ते असेही म्हणाले की, “मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी, नाटक यामध्ये सर्व पद्धतीच्या भूमिका अशोक सराफ यांनी साकारल्या. त्यांनी साकारलेला नायक हा स्वप्नातील नव्हे तर खऱ्याखुऱ्या जीवनातील नायक वाटायचे. त्यांचे चित्रपट पाहून आम्ही मोठे झालो.
महाराष्ट्राची भूमी ही कलाकारांची खाण - मंत्री सुधीर मुनगंटीवार
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "महाराष्ट्र हे जसे आर्थिक शक्तिकेंद्र आहे, तसे ते सांस्कृतिक शक्तिकेंद्र आहे. महाराष्ट्राची भूमी ही आता कलाकारांची खाण झाली आहे. या कलावंतांचा सन्मान करताना सांस्कृतिक कार्य विभाग सोनेरी झाला, असल्याची भावना यावेळेस त्यांनी व्यक्त केली.
फिल्मसिटीच्या बाहेर जेथे चित्रिकरण असेल तिथे शुल्क आकारले जाणार नाही. मनोरंजन करातून सुट या आधीच दिली असल्याचे सांगून जगातील सर्वोत्तम फिल्मसिटी करू शकतो, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
रसिक प्रेक्षकांचे प्रेम कायम हृदयात राहील - अशोक सराफ
“महाराष्ट्रातील एक क्रमांकाचा पुरस्कार तुम्ही मला दिला आहे, याचा खरोकर आनंद आहे. माझ्या जन्मभूमी आणि कर्मभूमीने माझा गौरव केला. महाराष्ट्र भूषण मिळणाऱ्यांची यादी भाली मोठी. त्यामध्ये मला स्थान दिले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पन्नास वर्षाच्या प्रवासात ज्यांनी मला कळत-नकळत का होईना मदत केली आहे, ही सगळी त्यांची किमया आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रसिक प्रेक्षक. जे आवडले तर डोक्यावर घेतात. रसिकांना आवडले पाहिजे हाच दृष्टीकोन ठेवला. रसिकांनी प्रेम दिले. ते उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. माझ्या हृदयामध्ये हे प्रेम कायम राहील”, अशी भावना यावेळी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली.
आणखी वाचा