उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये रस्ते अपघात 11 जणांचा मृत्यू, बसवर डंपर पडल्यामुळे घडली घटना

| Published : May 26 2024, 08:57 AM IST / Updated: May 26 2024, 08:58 AM IST

Rajasthan Road accident
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये रस्ते अपघात 11 जणांचा मृत्यू, बसवर डंपर पडल्यामुळे घडली घटना
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये भीषण अपघात झाला असून त्यामध्ये 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातात डंपरने बसला धडक देऊन तो परत कोसळल्यामुळे ही घटना घडली आहे. 

उत्तर प्रदेशातील शाहजहापूर येथे भीषण अपघात झाला असून त्यामध्ये 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सीतापूरहून उत्तराखंड पूर्णगिरीकडे जाणाऱ्या बसला डंपरने धडक दिली आणि त्यामध्येच ही घटना घडली आहे. या धडकेनंतर डंपर हा बसवर पलटी झाला असून यामध्ये हा अपघात भीषण होता. जखमींना जवळच्या वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

कशी झाली धडक? - 
सीतापूरहून भाविकांची बस उत्तराखंड पूर्णागिरीला जात होती. शाहजहांपूर पोलीस स्टेशन खुटर परिसरातील गोला बायपास रोडवर असलेल्या ढाब्याजवळ उभ्या असलेल्या एक डंपरने बसला धडक दिली. धडक एवढी पटकन झाली की त्यानंतर डंपर डायरेक्ट बसवरच पडला होता. मृतांमध्ये महिला आणि बालकांचा समावेश असून इतर जखमी रुग्णांवर उपचार केले जात आहेत. 

एसपीनी दिली या घटनेची माहिती - 
खुटर पोलीस स्टेशन हद्दीतील गोला बायपास रोडवर रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली. बस एका ढाब्याजवळ उभी असताना. काही लोक जेवण करत होते तर काही लोक बसमध्ये बसले होते. त्यानंतर गिट्टीने भरलेला अनियंत्रित ट्रक बसवर उलटला. या अपघातात कारमधील 11 प्रवाशांचा मृत्यू झाला. बसवर ट्रक पलटी झाल्यावर अनेक मृतदेह खाली अडकले, त्यांना बऱ्याच प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले. तसेच, सर्व 10 जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व लोक कमलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीतापूर, बडा जेठा येथील सिधौली येथून येत होते. सध्या या घटनेचे मुख्य कारण शोधण्यासाठीही तपास सुरु आहे. 
आणखी वाचा - 
Delhi Fire : दिल्लीतील चिल्ड्रेन हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 6 बालकांचा मृत्यू, अनेक जखमी झाल्याचा अंदाज
India Weather : उत्तर भारतात उष्णतेची लाट, 'हे' शहर सर्वात उष्ण