ज्ञानवापीच्या तळघरात हिंदूंना पूजा करण्यास परवानगी कायम, मुस्लिम पक्षाची याचिका कोर्टाने फेटाळली

| Published : Feb 26 2024, 11:35 AM IST / Updated: Feb 26 2024, 02:01 PM IST

gyanvapi masjid

सार

Gyanvapi Mosque Case : वाराणसी कोर्टाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेला अलहाबाद उच्च न्यायालयाने सुनावणी करत याचिका फेटाळली आहे.

Gyanvapi Mosque Case : मुस्लिम पक्षाने ज्ञानवापी मस्जिदच्या तहखान्यात हिंदूंना पूजा-प्रार्थना करण्याची परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात एक याचिका कोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी (26 फेब्रुवारी) अलहाबाद उच्च न्यायालयाने सुनावणी करत वाराणसी जिल्हा कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात 31 जानेवारीला कोर्टाने निर्णय देत म्हटले एक पुजारी ज्ञानवापी मस्जिदच्या दक्षिणेकडील तहखान्यात पूजा-प्रार्थना करू शकतो. हा आदेश शैलेंन्द्र कुमार पाठक यांच्या याचिकेवर देण्यात आला होता. त्यांनी म्हटले होते की, नाना सोमनाथ व्यास यांनी डिसेंबर 1993 पर्यंत पूजा-प्रार्थना केली होती. शैलेंन्द्र कुमार पाठक यांनी कोर्टाला विनवणी केली होती की, एक वंशपरंपरागत पुजारी म्हणून त्यांना तळघरात प्रवेश आणि पुन्हा पूजा करण्याची परवानगी द्यावी.

अलहाबाद उच्च न्यायालयाने केली ज्ञानवापी प्रकरणात सुनावणी
वारणसी जिल्हा कोर्टाने मंदिरात पूजा करण्यास परवानगी दिल्याचा निर्णय सुनावला होता. खरंतर हा निर्णय भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षणाच्या अहवालानंतर देण्यात आला होता. दुसऱ्या बाजूला मस्जिदीच्या समितीने यावर आक्षेप घेतला. समितीने म्हटले की, तळघरात कोणतीही मूर्ती नव्हती. यामुळे वर्ष 1993 पर्यंत येथे पूजा-प्रार्थना केल्याचा प्रश्नच उपस्थितीत राहत नाही.

अलहाबाद उच्च न्यायालयाद्वारे वाराणसी जिल्हा कोर्टाच्या आदेशाच्या विरोधात त्याच याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिल्याच्या काही तासांमध्ये मस्जिद समितीने 2 फेब्रुवारीला उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर 15 फेब्रुवारीला दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अलहाबाद उच्च न्यायालयानेआपला निर्णय राखून ठेवला होता.

आणखी वाचा : 

Railway Project : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशात 41 हजार कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन

Haldwani Violence : हलद्वानी हिंसाचारातील मास्टरमाइंड अब्दुल मलिकला दिल्लीतून अटक, उत्तराखंड पोलिसांची मोठी कारवाई

जम्मू काश्मीरमधील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता याना मीरने UK संसदेत दिले धडाकेबाज भाषण (Watch Video)