सार
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 553 रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास केला जाणार आहे. या रेल्वे स्थानकांची पायाभरणी केली जाणार आहे.
Railway Project : भारतात सध्या रेल्वे क्षेत्रात दिवसागणिक नवी कामे केली जात आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर माहिती देत म्हटले की, आज (26 फेब्रुवारी) आपल्या रेल्वेसाठी ऐतिहासिक दिवस आहे. सोमवारी दुपारी 12.30 वाजता दोन हजारांहून अधिक आणि 41 हजार कोटी रुपयांच्या रेल्वेसाठीच्या पायाभूत सुविधांचे प्रकल्प देशासाठी लाँच केले जाणार आहेत.
पुढे म्हटले की, प्रवासाचा अनुभव उत्तम व्हावा यासाठी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 553 रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास केला जाणार आहे. या रेल्वे स्थानकांची पायाभरणी केली जाणार आहे. संपूर्ण भारतात ओव्हरब्रिज आणि अंडरपासचे देखील उद्घाटन केले जाणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान आपल्या भाषणात सध्या ‘मोदी की गॅरंटी’ शब्दाचा उल्लेख करत आहेत. जेणेकरुन या शब्दाचे पालन करण्याच्या दिशेने काम करण्याचा प्रयत्न करतायत.
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुर्नविकास केल्या जाणाऱ्या 553 रेल्वे स्थानकांच्या योजनेतील दुसऱ्या टप्प्यादरम्यान पुणे येथील 10 रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास केला जाणार आहे. यामध्ये देहु रोड, चिंचवड, हडपसर, उरूली, वाथर, लोनंद, सांगली, केडगाव, बारामती आणि कराडचा समावेश आहे. याशिवाय पुण्यातील रेल्वे डिव्हिजनमध्ये 25 वेगवेगळ्या ठिकाणी रोड-ओव्हरब्रिज आणि रोड-अंडरब्रिजचे बांधकाम केले जाणार आहे.
रेल्वे प्रकल्पासंदर्भातील माहिती
- पंतप्रधान नरेंद्र मोदी अमृत भारत योजनेअंतर्गत 553 रेल्वे स्थानकांच्या पुर्नविकासाची पायाभरणी करणार आहेत.
- रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फ्रेन्सिंगच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या राज्यातील जवळजवळ 500 रोड ओव्हरब्रिज आणि अंडरब्रिजची पायाभरणी करणार आहेत.
- 27 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात विस्तारलेल्या अमृत भारत स्थानकांचा पुर्नविकास 19 हजार कोटींहून अधिक रुपये खर्च करून केला जाणार आहे.
- रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक सोयी-सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
- पंतप्रधान 1500 ओव्हरब्रिज आणि अंडरपासब्रिजची पायाभरणी, उद्घाटन करणार आहेत. हे ब्रिज 24 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये विस्तारले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी 21,520 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
- या प्रकल्पांमध्ये रेल्वे स्थानकात होणारी गर्दी कमी होईल, सुरक्षितता वाढेल आणि प्रवासाचा अनुभव सुखकर होणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 फेब्रुवारीला गुरुग्राम रेल्वे स्थानकाच्या अद्ययावतीकरणाची पायाभरणी करणार आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्ट्सनुसार, पहिल्या टप्प्यातील प्रोजेक्टची किंमत 295 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
- नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील गोमती नगर स्थानकाचेही उद्घाटन करणार आहेत. यासाठी 385 कोटी रुपयांचा खर्च करून पुर्नविकास केला जाणार आहे.
आणखी वाचा :
तुमच्याकडे ई-श्रम योजनेचे कार्ड आहे? जाणून घ्या फायद्यासह ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया