- Home
- India
- Government Employee : या राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, अखेर आली आनंदाची बातमी!
Government Employee : या राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, अखेर आली आनंदाची बातमी!
Government Employee : दुर्गापूजेनिमित्त दिलेली ही वाढ १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा एकूण डीए ३६% होईल. त्रिपुरा सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कर्मचाऱ्याना पुढील डीएची वाढ कधी मिळेल, याची प्रतिक्षा करण्यात येत आहे

महागाई भत्त्यात वाढ
केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक पुढील महागाई भत्ता वाढीची वाट पाहत आहेत. दिवाळीपूर्वी DA/DR वाढीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये सरकारने 2% वाढ जाहीर केली होती.
केंद्र सरकार
सध्या, मार्चमधील वाढीनंतर, केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ५५% महागाई भत्ता/डीआर मिळत आहे. राज्य सरकारची ही ३% अतिरिक्त वाढ एक महत्त्वाचा निर्णय मानला जातो. त्रिपुरातील कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे.
त्रिपुरा सरकार
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी ३% अतिरिक्त डीए आणि डीआरची घोषणा केली. १ ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या या निर्णयाचा १ लाखांहून अधिक कर्मचारी आणि ८४ हजार पेन्शनधारकांना फायदा होईल.
डीए वाढ
या ३% वाढीमुळे त्रिपुरा सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए ३६% झाला आहे. तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या ५२% डीए मिळतो. गेल्या काही वर्षांत त्रिपुरा सरकारने सातत्याने डीए वाढवला आहे.
महाराष्ट्र सरकारक़डून प्रतिक्षा
महाराष्ट्रात पुढील डीए वाढ कधी होईल याची प्रतिक्षा करण्यात येत आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्यात डीए वाढविण्यात आला होता. तो ५० टक्क्यांवरुन ३ टक्क्यांनी वाढविण्यात आला होता. आता तो ५३ टक्के आहे. आता यापुढील वाढ कधी मिळेल याची वाट बघितली जात आहे.

