गुगलने त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये मोठा बदल केला आहे. आता गुगल तुमच्या जीमेल, गुगल फोटोज आणि गुगल ड्राईव्हमधील डेटाचा वापर करून तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जाहिराती दाखवू शकतं.
न्यूयॉर्क: गुगलने त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये मोठा बदल केला आहे. आता गुगल तुमच्या जीमेल, गुगल फोटोज आणि गुगल ड्राईव्हमधील डेटा वाचून तुम्हाला तुमच्या आवडीच्या जाहिराती दाखवू शकतं. यासाठी कंपनीने आपल्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.
आजवर गुगलचा नियम असा होता की, या तीनही प्लॅटफॉर्म्सवरील युजर्सचा डेटा जाहिरातींसाठी वापरला जाणार नाही. पण आता कंपनीने या नियमाची भाषाच बदलली आहे. नव्या नियमानुसार, जर तुम्ही या सेवा इतर गुगल प्रॉडक्ट्ससोबत लिंक केल्या असतील, तर त्या डेटाचा वापर करून तुम्हाला जाहिराती दाखवल्या जातील. ज्या युजर्सनी त्यांचे ईमेल्स आणि फोटोज पर्सनलाईज्ड इंटेलिजन्ससारख्या एआय (AI) सेवांशी जोडले आहेत, त्यांच्यासाठी हा बदल मोठा धक्का मानला जात आहे.
