Tukaram mundhe

Share this Video

पुण्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्हे प्रोटीन आणि हेल्थ सप्लिमेंट्सच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती व ब्रँडिंगवर कारवाईचा इशारा दिला. प्रोटीन पावडरमुळे स्नायू वाढतात, असे अप्रमाणित दावे करता येणार नाहीत. जिम, हेल्थ क्लब आणि विक्रेत्यांना सप्लिमेंट्स विकण्यासाठी आवश्यक FSSAI परवाना असणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चुकीच्या उत्पादनांसाठी उत्पादक, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेते सर्वांची स्वतंत्र जबाबदारी असेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केवळ निलंबन नव्हे, तर परवाना रद्द करण्यासह कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मुंढे म्हणाले. तरुणांनी सप्लिमेंट्सचे लेबल तपासावे आणि गरजेनुसार डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. FDA प्रयोगशाळांचे अहवाल सुमारे २० दिवसांत मिळत असून ते १४ दिवसांत देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. इंडु केअर कंपनीविरोधात पुन्हा कारवाई सुरू केल्याची माहितीही दिली. आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी आपली वैयक्तिक भूमिका स्पष्ट केली.

Related Video