सार

Global Technology Summit: केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत भारताचा नेमका काय दृष्टीकोन आहे, याबाबतची माहिती जगासमोर मांडली.  

Rajeev Chandrasekhar on AI:  केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स व सेमीकंडक्टरसंदर्भात असलेला भारताचा दृष्टीकोन जगासमोर मांडला आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या ग्लोबल टेक्नोलॉजी समिट 2023 मध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांनी कित्येक गोष्टींवर चर्चा केली. 

चंद्रशेखर म्हणाले की, भारत देश वर्ष 2021पासूनच हे सांगत आहे की जगात कित्येक टेक्नोलॉजी येणार आहोत, ज्याबाबत चर्चा करणं अतिशय आवश्यक आहे. या टेक्नोलॉजी केवळ महत्त्वाच्याच नाहीत तर यांचा सुरक्षितरित्या वापर करण्याबाबतही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

ग्लोबल टेक्नोलॉजी समिट 2023

केंद्रीय राज्यमंत्री असेही म्हणाले की, जेव्हा आम्ही आर्टिफिशअल टेक्नोलॉजी व यामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानाबाबत चर्चा केली, तेव्हा अनेक देशांतील सरकारांकडून अवाजवी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होती. पण भारत देशाने कधीही आपली भूमिका बदलली नाही. 

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, आर्टिफिशिअल टेक्नोलॉजी पुढील काही दशकात आरोग्यसेवा, शिक्षण यांसारख्या क्षेत्रात मोठी भूमिका बजावू शकते.

 

राजीव चंद्रशेखर डीपफेकबाबत काय म्हणाले?

राजीव चंद्रशेखर यांनी यावेळेस डीप फेक यासारख्या टेक्नोलॉजीमुळे होणाऱ्या नुकसानाबाबतही चर्चा केली. “सर्व आर्टिफिशअल टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्म आणि नॉन एआय प्लॅटफॉर्मने जबाबदार होणे गरजेचं आहे, तेव्हाच यामुळे होणाऱ्या नुकसानांपासून आपला बचाव होऊ शकतो. पुढील दशकासाठी नवनवीन शोध आणि संधी निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट असले पाहिजे”, असे विधान त्यांनी केले. 

YouTube video player

आखणी वाचा: 

Global Technology Summit 2023: युद्धात गेम चेंजरची भूमिका निभावतेय तंत्रज्ञान - राजनाथ सिंह

Video: जन्मत: हात नाहीत, उत्तमरित्या पायाने चालवते कार; केरळच्या तरुणीची प्रेरणादायी कथा

Pneumonia Outbreak : चीनमध्ये नव्या महामारीचा धोका वाढतोय, महाराष्ट्रासह या राज्यांतही अ‍ॅलर्ट जारी