MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • 1 ऑगस्टपासून बदलणार हे 5 मोठे नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

1 ऑगस्टपासून बदलणार हे 5 मोठे नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

1 ऑगस्ट 2026 पासून रेल्वे तात्काळ तिकीट बुकिंग, ITR, क्रेडिट कार्ड, FD, LPG सिलेंडर आणि आधार KYC संदर्भातील अनेक आर्थिक नियम बदलणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आर्थिक व्यवहारांवर होणार आहे.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Jul 28 2026, 09:28 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
1 ऑगस्टपासून रेल्वे तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलणार
Image Credit : our own

1 ऑगस्टपासून रेल्वे तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलणार

1 ऑगस्ट 2026 पासून भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत बदल केला आहे. आता तात्काळ तिकीट बुकिंग सुरू होईल त्याच वेळी टोकन वाटपही सुरू होणार आहे. यामुळे आरक्षण केंद्रांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. यामुळे प्रवाशांचा रांगेत उभे राहण्याचा वेळही वाचणार आहे. यापूर्वी टोकन घेण्यासाठी आणि तिकीट बुकिंगसाठी वेगवेगळ्या वेळेला काउंटरवर जावे लागत होते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
आधार KYC प्रक्रियेत मोठा बदल
Image Credit : Freepik

आधार KYC प्रक्रियेत मोठा बदल

येत्या 1 ऑगस्टपासून आधारशी संबंधित KYC प्रक्रियेतही महत्त्वाचा बदल होणार आहे. बँका, विमा कंपन्या आणि मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या (Asset Management Companies) Central KYC 2.0 (CKYC) प्रणाली लागू करणार आहेत. या नव्या प्रणालीमुळे खाते उघडताना किंवा KYC अपडेट करताना ग्राहकाच्या संमतीनंतर केंद्रीय नोंदणीतील माहिती थेट वापरता येणार आहे. यामुळे आर्थिक फसवणूक रोखण्यास मदत होईल.

Related Articles

Related image1
Train Ticket Booking: ट्रेनच टिकिट कस काढायच, कन्फर्म टिकिट मिळवण्यासाठी करा ही प्रोसेस
Related image2
Saving Investment Scheme : महिन्याला २० हजार पेन्शन, किती गुंतवणूक करावी लागेल? समजून घ्या कॅल्क्युलेशन
35
एलपीजी सिलेंडरच्या दरात होऊ शकतो बदल
Image Credit : ANI

एलपीजी सिलेंडरच्या दरात होऊ शकतो बदल

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर करतात. 1 ऑगस्टलाही दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.जर दर वाढले तर घरगुती खर्च वाढू शकतो, तर दर कमी झाल्यास ग्राहकांना दिलासा मिळू शकतो.

45
क्रेडिट कार्ड आणि एफडीच्या नियमांमध्ये होऊ शकतात बदल
Image Credit : Getty

क्रेडिट कार्ड आणि एफडीच्या नियमांमध्ये होऊ शकतात बदल

1 ऑगस्टपासून अनेक बँका क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल करू शकतात. यामध्ये रिवॉर्ड पॉइंट्स, वार्षिक शुल्क, सेवा शुल्क किंवा इतर सुविधांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. याशिवाय काही बँका मुदत ठेव (FD) वरील व्याजदरातही बदल करू शकतात. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीत रेपो दराबाबत निर्णय झाल्यास त्याचा परिणाम गृहकर्ज, वाहन कर्जाच्या EMI तसेच FD वरील व्याजदरांवर होऊ शकतो.

55
ITR भरण्याची मुदत संपली
Image Credit : Getty

ITR भरण्याची मुदत संपली

आर्थिक वर्ष 2026-27 साठी ITR-1 आणि ITR-2 भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 होती. या मुदतीत रिटर्न न भरलेल्या करदात्यांना आता दंड भरावा लागू शकतो. तसेच काही कर प्रणालींचा (Tax Regime) लाभही गमवावा लागू शकतो.दरम्यान, ITR-3 आणि ITR-4 (नॉन-ऑडिट) भरण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. तर ऑडिट प्रकरणांसाठी 31 ऑक्टोबर 2026 निश्चित करण्यात आली आहे. बिलेटेड रिटर्न 31 डिसेंबर 2026 पर्यंत आणि सुधारित (Revised) रिटर्न 31 मार्च 2027 पर्यंत भरता येईल.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
भारताचे बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Now Playing
सोनम वांगचुक; राजीनामा ही सुरुवात | Dharmendra Pradhan | Student Protest | Sonam Wangchuk
Recommended image2
Paper Leak New Law : १० वर्षांचा तुरुंगवास, १० कोटींचा दंड आणि... पेपरफुटी विरोधातील कायद्यात ५ मोठे बदल
Recommended image3
Now Playing
आशुतोष रांकांचा इशारा; FIR मागे घ्या, नाहीतर पुन्हा आंदोलन | Student Protest | CJP | Kapil Sibal
Recommended image4
Now Playing
रामदास आठवलेंचं विरोधकांना प्रत्युत्तर | Parliament | StudentProtest | CJI
Recommended image5
CJP Protest: 'दिलेला शब्द मोडला'... विद्यार्थ्यांवरील कारवाईवरुन कॉकरोच जनता पार्टीचा सरकारला इशारा
Related Stories
Recommended image1
Train Ticket Booking: ट्रेनच टिकिट कस काढायच, कन्फर्म टिकिट मिळवण्यासाठी करा ही प्रोसेस
Recommended image2
Saving Investment Scheme : महिन्याला २० हजार पेन्शन, किती गुंतवणूक करावी लागेल? समजून घ्या कॅल्क्युलेशन
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved