सार
अरिवद केजरीवाल यांना जामीन मिळणार असून ते लवकरच तिहार तुरुंगातून बाहेर येणार आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दारू घोटाळा प्रकरणात अटक केलेल्या अरविंद केजरीवाल यांना लवकरच अंतरिम जामीन जाहीर केला जाणार आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला असून तो एक जूनपर्यंत मिळाला आहे, असे सांगण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकांच्या तीन टप्यांमधील निवडणूक झाल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
अरविंद केजरीवाल यांना प्रचार करण्यासाठी मिळाली परवानगी -
अरविंद केजरीवाल यांना एक जूनपर्यंत जामीन मिळाला असून तो संपल्यानंतर त्यांना हजर व्हावे लागणार आहे. संजीव संजीव खन्ना आणि दीपंकर दत्त यांच्या खंडपीठाकडून हा जामीन मंजूर झाला आहे. अरविंद केजरीवाल हे जेलमधून बाहेर आल्यास प्रचारामध्ये गुंतणार असून त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश भरला आहे. केजरीवाल आता आप आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत.
कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये उत्साह -
अरविंद केजरीवाल हे असल्यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये नेत्यांमध्ये उत्साह आला आहे. या ठिकाणी आता आपचे नेते, कार्यकर्ते आणि अरविंद केजरीवाल सर्वच जण प्रचारामध्ये गुंतून जाणार आहेत. कोर्टाने निकाल दिल्यानंतर आता खरी रंगत येणार आहे. निवडणुकीच्या प्रचारात आता आम आदमी पार्टी किती आघाडी घेते ते लवकरच दिसून येईल.
अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीने पहिला कारभार -
अरविंद केजरीवाल हे तुरुंगात तुरुंगात गेल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी कारभार पाहायला सुरुवात केली. त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अनुपस्थितीमध्ये आम आदमी पार्टीची धुरा सांभाळण्याचे काम केले. मीडियाच्या प्रश्नांना सुनीता याच उत्तरे देत असत.
आणखी वाचा -
शरिया कायद्याबद्दल चिंता असून तो अमेरिकेतील लोकांवर लादला जाण्याची भीती वाटतेय, रीप चिप रॉय यांचे भाषण झाले व्हायरल
“काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएमध्ये या...”, मोदींनी दिली शरद पवारांना ऑफर