सार
शेतकऱ्यांच्या पिकांसाठी किमान आधारभूत किंमत देणारा कायदा (MSP) तयार करण्यासह अन्य मागण्यांवरुन आज शेतकऱ्यांचे ‘दिल्ली चलो’ आंदोलन सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी राज्याच्या सीमारेषांवर कठोर सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे.
Farmers' protest 2.0 : शेतकरी आज (13 फेब्रुवारी) आपल्या मागण्यांवरुन दिल्लीत आंदोलन करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस अॅलर्टवर आहेत. याशिवाय दिल्लीच्या सर्व सीमांवर कठोर सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दिल्ली येण्यापासून रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता 2500 ट्रॅक्टर्ससह शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे. हे शेतकरी पंजाबमधील संगरुर येथील आहेत.
केंद्रीय मंत्र्यांसोबत शेतकरी नेत्यांची बैठक
सोमवारी (12 फेब्रुवारी) केंद्रीय मंत्र्यांसोबत शेतकऱ्यांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काही तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांकडून पिकांसाठी किमान आधारभूत किंमत देणारा कायदा आणि अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांकडून ‘दिल्ली चलो’ च्या हाकेमुळे दिल्ली पोलिसांकडून राज्यात महिनाभर रॅली आणि आंदोलने करण्यावर बंदी घातली आहे. याशिवाय सर्वत्र बॅरिकेड्स आणि रस्त्यांवर खिळे आणि टोकदार तारा देखील लावण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या काय आहेत मागण्या?
- पिकांसाठी किमान आधारभूत किंमत देणारा कायदा तयार करावा
- स्वामिनाथ आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात
- आंदोलनातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे
- दुग्धजन्य पदार्थ, कृषी वस्तू, मांस, फळे आणि भाजापाला यांच्यावरील आयात शुक्ल कमी करत भत्ता वाढवावा
- वयाच्या 58 वर्षांवरील शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन योजना लागू करत प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपये पेन्शन द्यावी
- लखमीपूर खेरी हिंसाचारातील पीडित व्यक्तींना न्याय मिळवून द्यावा
- पंतप्रधान पीक विमा योजनेत सुधारणा करत विम्याचा हप्ता सरकारने स्वत: भरावा
आणखी वाचा :
शेतकऱ्यांच्या आंदोलनाआधी दिल्ली पोलीस हाय अॅलर्टवर, हरियाणातील सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद
रवींद्र जडेजावर वडिलांनी लावलेल्या आरोपांवर क्रिकेटरची पत्नी संतप्त, दिली अशी प्रतिक्रिया