Devendra Fadnavis

Share this Video

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मंत्रिमंडळात सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले. दुष्काळग्रस्त भाग आणि उपाययोजनांबाबतची पहिली अधिसूचना तीन दिवसांत काढली जाणार असून उद्यापासून पंचनाम्यांचे आदेश देण्यात आले आहेत. सोयाबीन, मका, कापूस, भात आणि ज्वारीसह विविध पिकांच्या नुकसानीची माहिती गोळा केली जात असून पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीही स्थापन करण्यात आली आहे. केंद्राकडे आर्थिक मदतीचा प्रस्ताव पाठवला जाणार असला तरी त्याची वाट न पाहता राज्याची मदत सुरू राहील, असे फडणवीस म्हणाले. MPSC बाबत उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न पुन्हा स्वीकारण्यास सरकार सकारात्मक असून आगामी परीक्षेत विक्रमी पदे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Video