सार

तेलंगणाच्या राज्यपालांनी राजीनामा दिला असून त्या लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. सुश्री सुंदरराजन या पॉंडिचेरी येथून लोकसभा निवडणूक लढवू शकतात. 

सोमवारी सकाळी तेलंगणाच्या राज्यपाल तमिलीसाई सुंदरराजन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्या तमिळनाडू भाजपच्या नेत्या असून त्यांना आगामी लोकसभा निवडणूक लढवायची आहे. त्यांच्याकडे पॉंडिचेरी राज्याच्या अतिरिक्त राज्यपाल पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्या पॉंडिचेरी येथील एकमेव लोकसभा मतदारसंघातून उभ्या राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुश्री सुंदरराजन यांच्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळात पॉंडिचेरी येथील लोकांशी संपर्क आला होता. त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी तामिळनाडू येथून तीन वेळा विधानसभेच्या निवडणुका लढवल्या होत्या पण या तिन्ही निवडणुकांमध्ये त्यांना हार पत्करावी लागली.

भारत राष्ट्र समितीचे तेलंगणामध्ये सरकार असताना सुंदरराजन राज्यपाल होत्या. यावेळी त्यांचे तेलंगणा सरकारसोबत अनेकवेळा वादाचे प्रसंग घडले होते. मागील वर्षी मार्चमध्ये भारत राष्ट्र समितीने राज्यपालांच्या विलंबामुळे अनेक विधेयके मंजूर करण्यात विलंब झाला अशी सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. सुंदरराजन यांनी मुख्यमंत्र्यांनी आपला फोन टॅप केल्याचा आरोप केला होता.
आणखी वाचा - 
PM Narendra Modi : इंडिया आघाडीची लढाई शक्तीच्या विरोधात, आई-बहिणींच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावणार
बंगळुरूमध्ये भक्तीगीत वाजवल्याबद्दल सहा जणांना मारहाण, भाजपने केली कर्नाटक सरकारवर टीका