Eknath Shinde

Share this Video

मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळी परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. दुष्काळसदृश भागात प्राथमिक दुष्काळ एक-दोन दिवसांत जाहीर होईल आणि उद्यापासून ग्रामसेवक, तलाठी व कृषी सेवकांकडून तातडीने पंचनामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री काही भागांचा दौरा करणार असून, आपण अमरावती विभागातील दुष्काळग्रस्त भागात जाणार असल्याचेही शिंदे म्हणाले. पावसाअभावी उभी पिके करपल्याने शेतकरी संकटात असून त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले. नुकसानीचे पंचनामे करून युद्धपातळीवर मदत दिली जाईल आणि केंद्र सरकारकडेही मदत मागितली जाईल. शिवसेनेच्या मंत्र्यांना दुष्काळग्रस्त भागात जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या भागांत टँकर, गरजेनुसार चारा छावण्या तसेच पुढील एक-दोन महिन्यांसाठी पाणी आणि चाऱ्याचे नियोजन केले जाईल. शेतकऱ्यांच्या मुलींची लग्ने ठरली असल्यास अशा कुटुंबांची जबाबदारीही शिवसेना घेईल, असे शिंदे यांनी सांगितले.

Related Video