सार

ED Raid in Jharkhand : ईडीने रांचीमध्ये काही ठिकाणी छापेमारी केली. वीरेंद्र राम प्रकरणातील झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे सचिव लाल यांच्या नोकराच्या घरातून नोटांचे घबाड जप्त करण्यात आले आहे.

ED Raid in Jharkhand : ईडीने झारखंडमधील रांचीतील (Ranchi) काही ठिकाणी छापेमारी करत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे. ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम (Alamgir Alam) यांचा खासगी सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरात नोटांचे घबाड सापडले आहे. सूत्रांनुसार, 20-30 कोटी रुपयांची रोकड असल्याचा अनुमान लावला जात आहे. सध्या पैशांची मोजणी केली जात आहे. याआधी फेब्रुवारी 2023 मध्ये झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र के. राम यांना मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात अटक केली होती.

काळा पैसा असल्याचा ईडीला संशय
नोकराच्या घरात सापडलेली रक्कम काळा पैसा असल्याचा ईडीला (ED)संशय आहे. खरंतर, ईडीकडून 10 हजार रुपयांच्या लाच प्रकरणात तपास करत होती. याच दरम्यान काही गोष्टी अशा उलगडल्या की, त्याचे थेट कनेक्शन मंत्र्यांसोबत असल्याचे समोर आले. ईडीला मिळालेल्या माहितीनुसार, आलमगीर आलम यांच्या मंत्रालयात भ्रष्टाचार सुरू होता आणि त्यामधून जमा होणारी रोकड नोकरदारांच्या घरी ठेवली जात होती. यानंतर ईडीने आलमगीर यांच्या खासगी सचिवाकडील नोकराच्या घरावर छापेमारी केली. त्यावेळी नोकराच्या घरात नोटांचे घबाड ठेवल्याचे ईडीला दिसून आले.

पंतप्रधानांनकडूनही झारखंडमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थितीत
काही दिवसांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) झारखंडमध्ये निवडणूक प्रचारावेळी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थितीत केला होता. यानंतरच्या काही दिवसांनी ईडीने झारखंडमध्ये भ्रष्टाचारासंबंधित कारवाई केली आहे. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत म्हटले, पैशांची मोजणी होऊ द्या, 50 कोटी रुपये नक्कीच असतील. संपूर्ण झारखंड सरकार भ्रष्टाचारात बुडाले आहे.

आलमगीर आलम कोण आहेत?
आलमगीर आलम काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि झारखंडमधील चंपई सोरेन सरकारमधील मंत्री आहेत. याआधी हेमंत सोरेन यांच्या सरकारमध्येही आलमगीर मंत्री होते. याशिवाय विधानसभेचे अध्यक्षही होते. झामुमो, काँग्रेस आणि आरजेडी युतीच्या सरकारमध्ये आलमगीर यांना बडे नेते मानले जाते.

आणखी वाचा : 

अमेठी येथे काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरील वाहनांची तोडफोड, सुप्रिया श्रीनेत यांनी संतप्त शब्दात दिली अशी प्रतिक्रिया

मनोज तिवारी यांची मुलगी रीति तिवारीची BJP मध्ये एण्ट्री, पाहा काय म्हणाली…