Earthquake : चीननंतर आता म्यानमारमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद

| Published : Apr 29 2024, 07:42 AM IST / Updated: Apr 29 2024, 07:44 AM IST

earthquake  01
Earthquake : चीननंतर आता म्यानमारमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Earthquake in Myanmar : म्यानमारमध्ये सोमवारी जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. याआधी चीनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते.

Earthquake in Myanmar : जगातील वेगवेगळ्या ठिकाणी रविवारी (28 एप्रिल) आणि सोमवारी (29 एप्रिल) मध्यरात्रीदरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, रविवारी चीनमधील शिनजियांग (Xinjiang) येथे 4.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले गेले. याशिवाय मध्यरात्री 2 वाजून 15 मिनिटांनी मान्यमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल असल्याची नोंद करण्यात आली. सध्या कोणतीही जीवतहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.

याआधीही चीनमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के
याआधी जानेवारी महिन्यात चीनच्या शिनजियांगच्या दक्षिणेला भूकंपाचे झटके जाणवले होते. 7.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याची नोंद करण्यात आली होती. नॅशनल भूकंप विज्ञान केंद्रानुसार भूकंपाचा केंद्र चीनच्या शिनजियांग दक्षिणेकडील क्षेत्रापासून 80 किलोमीटर खोल होते. या भूकंपात सहाजण जखमी झाले होते. याशिवाय शेकडोहून अधिक घरांचे नुकसान झाले होते.

100 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू
गेल्या वर्षात डिसेंबर महिन्यात चीनमध्ये तीव्र भूकंपाचे झटके जाणवले होते. 18 डिसेंबरला गांसु आणि किंघाई प्रांतात भूकंप झाला होता. याची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल असल्याचे मोजण्यात आले होते. या भूकंपात 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. याशिवाय अनेकजण जखमीही झाले होते.

आणखी वाचा : 

अरविंद केजरीवाल यांचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रः लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मदत करण्यासाठी ईडीने केली अटक

मणिपूरमध्ये कुकी समाजातील समाजकंटकांकडून CRPF वर हल्ला, दोन जवान शहीद