सार

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्री राम मंदिराचे दरवाजे सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहेत. रामलला यांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी येथे पाहायला मिळत आहे.

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्री राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर मंगळवारी पहाटे रामलला यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मंगळवारी (23 जानेवारी) पहाटे श्री रामलला यांची पहिली आरती करण्यात आली. यावेळेस हजारो भाविक आरती सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. आरतीच्या सुरुवातीला मंदिराच्या गर्भगृहाचे सुवर्णद्वार उघडण्यात आले. यानंतर भाविकांनी रामलला यांचे डोळेभरून दर्शन घेतले.

सर्वसामान्यांना प्रभू श्री रामाचे दर्शन करता यावे, यासाठी मंगळवारी (23 जानेवारी) पहाटेपासूनच राम मंदिराचे द्वार खुले करण्यात आले आहे. सोमवारी (22 जानेवारी) रामलला यांचा विधिवत प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यानंतर आता या भव्य मंदिराचे रामभक्तांना दर्शन घेता येणार आहे. सकाळी 7 वाजेपासून ते सकाळी 11:30 वाजेपर्यंत आणि दुपारी 2 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले असेल.

पहाटे 3 वाजेपासून मंदिरामध्ये भाविकांची गर्दी

कडाक्याची थंडी असतानाही भाविकांनी पहाटे-पहाटे राम मंदिराच्या दर्शनासाठी गर्दी केली. पहाटेपासूनच मंदिराबाहेर भाविकांनी रांग लावली आहे. मंदिर परिसरामध्ये भाविक ‘जय श्री राम’ नामाचा गजर करत आहेत. 

रामलला यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

श्री राम मंदिरातील रामलला यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी विधिवत संपन्न झाला. या अनुष्ठानाचे मुख्य यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. या कार्यक्रमासाठी जवळपास 8 हजार पाहुण्यांनी आमंत्रित करण्यात आले होते.

आणखी वाचा

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून ते आरतीपर्यंतचे खास फोटो

Ram Mandir : हिरे-माणिक यासारख्या रत्नांनी सजलेली रामललांची मूर्ती

पंतप्रधान मोदींच्या अनुष्ठानाचे कौतुक करताना गोविंदगिरी महाराजांनी त्यांची शिवरायांशी केली तुलना, म्हणाले...