Delhi Building Collapse : दिल्लीत दुमजली इमारत कोसळली, दोन जणांचा मृत्यू

| Published : Mar 21 2024, 07:17 AM IST / Updated: Mar 21 2024, 07:57 AM IST

Bhiwandi building collapse

सार

दिल्लीतील वेलकम परिसराती एक दुमजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेच दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

Delhi Building Collapse : दिल्लीतील वेलकम परिसरात एक दुमजली इमारत बुधवारी (20 मार्च) मध्यरात्री कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेची माहिती पोलिसांना दिली असता तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. यामध्ये तीन जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मध्यरात्री कोसळली इमारत
कबीर नगर (Kabir Nagar) येथील वेलकम परिसरात असणारी एक जुनी दुमजली इमारत कोसळली गेलीय. या दुर्घटनेत अर्षद (30 वर्ष) आणि ताहुद (20 वर्ष) नावाच्या व्यक्तींना मृत घोषित करण्यात आले आहे. अन्य एक जण रेहान (22 वर्ष) याला दिल्लीती जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

इमारतीच्या मालकाचा घेतला जातोय शोध
इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तिघांनाही जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले आहे. सध्या बिल्डिंगच्या मालकाची ओखळ शाहिदच्या रुपात झाली असून त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. याशिवाय पोलिसांकडून दुर्घटनेसंदर्भात अधिक तपास केला जात आहे.

आंबेडकर नगरमध्येही घडली होती दुर्घटना
अशाचप्रकारची दुर्घटना एक महिन्याआधी दिल्लीतील आंबेडकर नगर परिसरात घडली होती. येथे बांधकामाधीन इमारतीचा चौथा मजला पत्त्यासारख्या कोसळला गेला. या दुर्घटनेत काहीजण अडकले गेले होते. दुर्घटना दक्षिणपुरीमधील सेंट्रल मार्केटच्या जी-ब्लॉकच्या ठिकाणी झाला होता. इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत चार ते पाच जण ढिगाऱ्याखाली अडकले गेले होते.

आणखी वाचा : 

Loksabha Election : निवडणूक प्रचारात कोणत्या चुका पक्ष आणि उमेदवारांना महागात पडू शकतात? आचारसंहितेचे नियम जाणून घ्या

Lok Sabha Election 2024 : बेघर मतदारांनाही करता येणार मतदान, निवडणूक आयोगाने सांगितला सोपा पर्याय

Zomato : झोमॅटोने व्हेज खवय्यांसाठी लॉन्च केले नवीन मोड, नेटिझन्सने कमेंट करून केले कौतुक