सार

झोमॅटो दरवेळी त्यांच्या मार्केटिंगसाठी नवीन पद्धती वापरत असते. व्हेज लोकांसाठी चांगली सेवा देता यावी म्हणून कंपनीने प्युअर व्हेज प्लिट सोबत प्युअर व्हेज मोड असे दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

झोमॅटो दरवेळी त्यांच्या मार्केटिंगसाठी नवीन पद्धती वापरत असते. व्हेज लोकांसाठी चांगली सेवा देता यावी म्हणून कंपनीने प्युअर व्हेज प्लिट सोबत प्युअर व्हेज मोड असे दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी ही माहिती दिली आहे. व्हेज जेवण कसे बनवले जाते आणि त्याला कसे हाताळण्यात येते यासाठी कंपनीने हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 

यावेळी गोयल यांनी बोलताना म्हटले आहे की, "भारतात सर्वात जास्त लोकसंख्या ही शाकाहारी अन्न खाणाऱ्या लोकांची आहे. झोमॅटोवरील ग्राहकांना प्युअर व्हेज जेवण खाता यावे म्हणून या नवीन पद्धतीचा अवलंब केला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यामुळे भविष्यात फक्त शाकाहारी असणाऱ्या ग्राहकांची तारांबळ होणार नाही. 

झोमॅटो प्युअर व्हेज मोड म्हणजे काय? 
तुम्हाला प्रश्न पडला असेल की झोमॅटो प्युरी व्हेज मोड म्हणजे तरी काय? तर हा मोड म्हणजे यामध्ये फक्त व्हेज जेवण देणाऱ्या हॉटेल्सची यादी दिली जाणार आहे. त्यामुळे फक्त शाकाहारी असणाऱ्या ग्राहकांची मोठी अडचण दूर व्हायला मदत मिळणार आहे. 

झोमॅटो प्युअर व्हेज क्लिट म्हणजे काय? 
यावर बोलताना झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी सांगितले की, झोमॅटो प्युअर व्हेज क्लिटमध्ये साधारणपणे फक्त व्हेजच्या ऑर्डर डिलिव्हरी करणारे ग्राहक असणार आहेत. ते मांसाहारी हॉटेलमध्ये जाणार नाहीत आणि मांसाहारी जेवणाची डिलिव्हरी करणार नाहीत. त्यांच्या या पद्धतीमुळे ग्राहक वाढतात का, याकडे सगळ्या स्टार्टअप जगताचे लक्ष लागून राहिलेले आहे. 
आणखी वाचा - 
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे NDA सोबत जाणार? उद्धव ठाकरेंना घरातूनच मिळणार आव्हान
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामुळे महाविकास आघाडीत वितुष्ट, लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर कोणता निर्णय घेणार?