सलग सातव्यांदा दिल्ली विमानतळ ठरले नंबर वन, जगात 9व्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त विमानतळ!
Delhi Airport Best in India South Asia : दिल्ली विमानतळाने 2025 च्या वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्समध्ये सलग सातव्यांदा भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळाचा मान मिळवला आहे. जागतिक दर्जाच्या सुविधांमुळे हा सन्मान मिळाला आहे.

दिल्ली विमानतळ नंबर वन
भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात दिल्ली विमानतळाने पुन्हा वर्चस्व सिद्ध केले आहे. मुंबई, बंगळूरला मागे टाकत सलग सातव्यांदा भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार जिंकला आहे.
IGIA: जागतिक कनेक्टिव्हिटी आणि रेकॉर्डब्रेक रँकिंग
दिल्लीचे IGIA विमानतळ 150 हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणांना जोडते. या मोठ्या नेटवर्कमुळे, हे जगातील 9व्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त विमानतळ बनले आहे.
IGIA: अत्याधुनिक टर्मिनल्स आणि प्रीमियम सुविधा
प्रवाशांच्या सोयीसाठी येथे जागतिक दर्जाचे टर्मिनल्स, मल्टी-लेव्हल कार पार्किंग आणि विमान प्रवासापूर्वी विश्रांतीसाठी प्रीमियम लाउंज यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
दिल्ली विमानतळावर प्रवाशांसाठी व्यापक सेवा
प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन दिल्ली विमानतळ विविध सेवा पुरवते. यामध्ये एटीएम, परकीय चलन काउंटर, कॅब सेवा, बॅगेज असिस्टन्स आणि 24 तास वैद्यकीय सुविधा यांचा समावेश आहे.
दिल्ली विमानतळ: स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य
स्वच्छता आणि टिकाऊपणाच्या बाबतीत दिल्ली विमानतळ विशेष काळजी घेते. येथे 170 हून अधिक पर्यावरणपूरक वॉशरूम आहेत. लहान मुलांसाठी बेबी केअर आणि दिव्यांगांसाठी विशेष सोयी आहेत.
IGIA: दिल्लीचे प्रवेशद्वार आणि ग्लोबल ट्रान्झिट हब
IGIA हे दिल्ली शहराचे प्रवेशद्वार आणि एक प्रमुख ग्लोबल ट्रान्झिट हब आहे. हे विमानतळ प्रवाशांना भारतीय आदरातिथ्य आणि आधुनिकतेची ओळख करून देते. सलग सातव्यांदा पुरस्कार जिंकला आहे.

