Andhra Pradesh Firecracker Factory Blast Kills 18 and Injures Several Others: आंध्र प्रदेशच्या काकीनाडा जिल्ह्यात एका फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत जवळपास १८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
आंध्र प्रदेशमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. काकीनाडा जिल्ह्यातील एका फटाके बनवण्याच्या फॅक्टरीमध्ये एक भयंकर स्फोट झाला. या स्फोटात जवळपास १८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.
ही दुर्घटना इतकी भीषण होती की मृतांच्या मृतदेहांच्या चिंधड्या उडाल्याचं सांगितलं जातंय. अनेक जण या घटनेत जखमी झाले आहेत.
काकीनाडा जिल्ह्यातील समरलाकोटा मंडळमध्ये घडली घटना
ही भीषण दुर्घटना काकीनाडा जिल्ह्यातील समरलाकोटा मंडळच्या वेतलापलेम गावात घडली. इथल्या फटाके बनवण्याच्या युनिटमध्ये अचानक हा मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत होते.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडून दुःख व्यक्त
या दुःखद घटनेची माहिती सर्वात आधी आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री अनिता यांनी दिली. त्यांनी मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त केली आहे. तर, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्र बाबू नायडू यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे कलेक्टर आणि जिल्हाधिकारी सगीली शान मोहन यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
