Arvind Kejriwal in Tears After Court Relief : दिल्ली दारू धोरण प्रकरणात तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निकालानंतर दिलासा मिळाला. यानंतर मीडियासमोर 'मी भ्रष्टाचारी नाही' असं म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले.

Arvind Kejriwal in Tears After Court Relief : दिल्ली दारू धोरण प्रकरणात तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निकालानंतर दिलासा मिळाला. यानंतर मीडियासमोर बोलताना 'मी भ्रष्टाचारी नाही' असं म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

हे पूर्णपणे बनावट प्रकरण आहे

त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल म्हणाले, 'हे पूर्णपणे एक बनावट प्रकरण आहे. यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हात आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हे सर्वात मोठं राजकीय षडयंत्र आहे. मी, सिसोदिया आणि 'आप' हे 'कट्टर इमानदार' आहोत, हे कोर्टाने सिद्ध केलं आहे,' असं म्हणताना ते भावुक झाले.

‘दिल्लीत नव्याने निवडणुका घ्या. भाजपने १० जागा जिंकल्या तर मी राजकारण सोडून देईन,’ असं आव्हानही केजरीवाल यांनी दिलं.

या प्रकरणात 'शौर्य' दाखवल्याबद्दल न्यायाधीश आणि कोर्टाचे केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आभार मानले.

खोटेपणाच्या जाळ्यावर कोर्टाची कात्री

'सत्याचाच विजय होतो. राजकीय सूडबुद्धीने माझ्यावर आरोप करण्यात आले होते. दिल्ली दारू धोरण प्रकरणात न्यायव्यवस्थेने खोटेपणाच्या जाळ्यावर कात्री चालवली आहे.' - के. कविता, अध्यक्षा, तेलंगणा जागृती.