सार

Lok Sabha Election 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याचा अखेर निर्णय झाला आहे. खरंतर, रायबरेली आणि अमेठी जागेसाठी सस्पेंस कायम होता. अशातच पक्षाने अमेठी आणि रायबरेलीतील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. 

Amethi and Raebareli Lok Sabha Seat : रायबरेली आणि अमेठी जागेवर काँग्रेस कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असा सस्पेंस कायम होता. अखेरच पक्षाने अमेठी येथून किशोर लाल शर्मा (Kisho Lal Sharma) आणि रायबरेलीतून काँग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) तिकीट दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून अशी जोरदार चर्चा सुरू होती की, सोनिया गांधी यांनी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेण्याच्या निर्णयामुळे राहुल गांधींच रायबरेलीतून निवडणूक लढवतील. याशिवाय प्रियांका गांधी-वाड्रा यांनीही यंदाची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

आजच दाखल करणार उमेदवारी अर्ज
राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवण्यासाठी आज (3 मे) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. खरंतर, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. यासंदर्भात काँग्रेस कार्यालयात तयारी सुरू करण्यात आली आहे. काँग्रेसने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर अमेठी आणि रायबरेलीतील उमेदवारांच्या नावांची यादी जारी केली.

20 मे रोजी होणार मतदान
उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली गांधी परिवाराचा गड होता. या दोन्ही जागांवर येत्या 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यसभेचे सदस्य झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी रायबरेली सीट सोडली होती. राहुल गांधी आधीच केरळातील वायनाड येथून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत.

रायबरेलीत राहुल गांधींविरोधातील उमेदवार कोण?
रायबरेलीत भाजपाने दिनेश प्रताप सिंह यांना निवडणुकीसाठी तिकीट दिले आहे. अशातच राहुल गांधींच्या विरोधात दिनेश प्रताप सिंह निवडणूक लढणार आहेत. वर्ष 2019 मधील निवडणुकीत सोनिया गांधी यांनी दिनेश प्रताप सिंह यांचा पराभव केला होता. अशातच हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की, सोनिया गांधीप्रमाणे रायबरेलीतील जनता राहुल गांधींवर किती विश्वास ठेवते. दरम्यान, सोनिया गांधी यांनी वर्ष 2004 आणि वर्ष 2024 दरम्यान रायबरेलीचे प्रतिनिधित्व केले आहे.

दुसऱ्या बाजूला किशन लाल शर्मा अमेठीतून भाजपा उमेदवार स्मृती इराणी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. वर्ष 2019 मधील निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला होता.

कोण आहेत किशन लाल शर्मा?
किशन लाल शर्मा मूळचे लुधियाना येथील स्थानिक असून दीर्घकाळापासून गांधी परिवाराचे निकटवर्तीय आहेत. अमेठी आणि रायबरेलीकरिता निवडणुकीसाठी रणनिती तयार करणे आणि नेतृत्व करण्याचे काम किशन लाल शर्मा करत आले आहेत. याशिवाय रायबरेलीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. किशन लाल शर्मा काँग्रेसमधील चाणाक्य असल्याचे बोलले जाते.

आणखी वाचा : 

‘प्रज्वल रेवन्नांना भगवान श्रीकृष्णांचा रेकॉर्ड ब्रेक करायचा होता’, कर्नाटकातील मंत्र्यांनी केलेल्या विधानावरून पेटला वाद

रुपाली गांगुलीने केला भाजमध्ये प्रवेश, पंतप्रधान मोदींच्या कार्याने झाल्या प्रभावित