सार
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे.
Loksabha Election 2024 : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे 2024 ची लोकसभा निवडणूक स्वतः लढण्याची शक्यता कमी आहे. ते स्वतः निवडणूक लढणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. खर्गे यांनी निवडणूक न लढवल्याने पक्षातील एका गटात अस्वस्थता पसरली असल्याचं सांगितले आहे. यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मात्र खर्गे यांनी आपण निवडणूक लढवण्याऐवजी पक्षासाठी लोकसभा कार्यकाळात काम करणार असल्याचे सांगितले आहे. कर्नाटकमधील गुलबर्गामधून खर्गे यांनी निवडणूक लढवण्याची शक्यता होती पण येथून त्यांनी जावई राधाकृष्णन दोड्डामणी यांना तिकीट जाहीर दिले आहे.
मल्लिकार्जुन खर्गे हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यांनी दोन वेळा गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकण्याचा विक्रम केला आहे. त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. त्यांचा मुलगा प्रियांक खर्गे कर्नाटक सरकारमध्ये मंत्री आहे. खर्गे यांना लोकसभा निवडणूक लढवायची नसून लोकसभेवर लक्ष द्यायचे आहे. पक्षध्यक्षपदाला लोकसभा निवडणूक लढवायची परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे.
राहूल गांधी आणि सोनिया गांधी हे पक्षाचे अध्यक्ष असताना लोकसभेतून खासदार झाले होते. मागील वर्षीच्या निवडणुकीत केरळमधील वायनाडमधून राहुल गांधी लोकसभेसाठी निवडून आले होते. यावेळी ते अमेठीमधून लढणार का याकडे सगल्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा हे यावर्षीची लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे लोकसभेसाठी इच्छुक नसल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. दुसऱ्या बाजूला त्यांचे नाव पंतप्रधान पदासाठी घेण्यात आले होते पण ते इच्छुक नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आणखी वाचा -
महाराष्ट्राला वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांचे मानले आभार, म्हणाले....
ग्रीन हायड्रोजनच्या वापरास प्रोत्साहन देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला आणखी एक झटका, चुरूचे खासदार राहुल कासवान यांनी पक्षाला दिली सोडचिट्ठी