काँग्रेस दिलेलं आश्वासन कधीच पूर्ण करत नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला हल्लाबोल

| Published : Apr 15 2024, 01:04 PM IST / Updated: Apr 15 2024, 01:05 PM IST

Devendra Fadnavis
काँग्रेस दिलेलं आश्वासन कधीच पूर्ण करत नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला हल्लाबोल
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

काँग्रेससाठी जाहीरनामा हा कागद असून भाजपसाठी मोदींची गॅरंटी आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी त्यांच्या कार्यकाळात काय काम करणार त्याबद्दलची माहिती जाहीरनाम्यात देण्यात आली आहे

काँग्रेससाठी जाहीरनामा हा कागद असून भाजपसाठी मोदींची गॅरंटी आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी त्यांच्या कार्यकाळात काय काम करणार त्याबद्दलची माहिती जाहीरनाम्यात देण्यात आली आहे. काँग्रेस काहीच काम करत नसून त्यांचा जाहीरनामा फक्त आश्वासन असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, पुढील पाच वर्ष 80 कोटी नागरिकांना धान्य मोफत देण्यात येणार आहे. 70 वर्षांवरील नागरिकांना युनिव्हर्सल मोफत उपचार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिलिंडरने गॅस वापरायची पद्धत कालबाह्य झाली असून आता पाईपने संपूर्ण भारतात गॅसचे वितरण केले जाणार आहे. मुद्रा योजनेची मर्यादा लवकरच वाढवली जाणार आहे. 

पाच प्रमुख पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केली जाणार  - 
नैसर्गिक शेतीच्या विकासावर यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. त्यांनी बोलताना म्हटले आहे की, "पाच प्रमुख पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केली जाणार आहे. गावोगावी धान्याचे गोदाम तयार केले जातील. त्यामुळे धान्य जास्त काळ टिकून राहत जाईल. फळ आणि भाजीपाला टिकवण्यासाठी मदत केली जाणार आहे. नॅनो युरियाचा वापर केला जाणार असून त्यामुळे युरियाचा वापर कमी होणार आहे. 

आगामी काळ स्टार्टअपचा - 
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या वतीने स्टार्टपला प्रोत्साहन दिले जाईल असे म्हटले आहे. स्टार्टअपला सर्व सुविधा एकाच ठिकाणी देण्यावर प्रामुख्याने भर दिला जाणार आहे. भारतामध्ये स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसून येत आहे. चीननंतर सर्वात जास्त स्टार्टअप भारतात असून त्यांना फंडिंग भेटत असल्याचं त्यांनी यावेळी म्हटले आहे. 
आणखी वाचा - 
संतापजनक! 45 वर्षीय व्यक्तीकडून चिरमुरीडवर बलात्कार, मिरा भायंदरमधील घटनेविरोधात स्थानिकांकडून आंदोलन
Crime : पाच वर्षीय चिमुरडीवर नराधमांनी बलात्कार करत केली हत्या, गोव्यातील घटनेने खळबळ