कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. या दरम्यान वाहनांची तोडफोड करण्यासह दगडफेकही करण्यात आली. यावरुनच आता पोलिसंकडून कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबई : कॉक्रोच जनता पार्टीने काल (20 जून) संसदेवर धडक मोर्चा काढला होता. यावेळी जंतर मंतरवर गदारोळाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्जही केला. याच स्थितीत दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. याच प्रकारावरुन आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

दोन FIR दाखल

दिल्लीतील कनॉट प्लेस आणि पार्लियामेंट स्ट्रीट पोलीस स्थानकात दोन एफआयआर (FIR) दाखल करण्यात आल्या आहेत. आंदोलनात हिंसाचार करणाऱ्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. कनॉट प्लेसजवळील रीगल सिनेमाजवळ पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. याशिवाय दगडफेकही केली गेली. तसेच जनपथ येथील दुकांनांचेही नुकसान करण्यात आले.

शेकडोहून अधिक पोलीस जखमी

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी सर्व नियमांचे उल्लंघन केले. याशिवाय दडफेक करण्यात आल्याने 118 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यासोबत 60 आंदोलकही जखमी झाले आहेत.

70 आंदोलक ताब्यात

पोलिसांनी आंदोलनाच्या घटनास्थळावरुन 70 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासह हिंसाचार करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या संपूर्ण प्रकरणाच्या तपासणीसाठी सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहण्यात येत आहेत.

आंदोलनाच्या ठिकाणी परतले आंदोलक

सोमवारी आंदोलनाला हिंसक वळण लागले गेले होते. यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना जंतर-मंतरवरुन हटवले होते. काल संध्याकाळी कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके आंदोलनाच्या ठिकाणाहून 500 मीटर दूरवर असणाऱ्या केरळ हाउस येथे आंदोलनासाठी बसले होते. पण आज सकाळी पुन्हा एकदा आंदोलक ठरवलेल्या ठिकाणी परतले आहेत. सध्या आंदोलनाच्या ठिकाणी शेकडोजण उपस्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे.