पोलिसांनी राजस्थानच्या किशनगडमध्ये एका इस्रायली महिला पर्यटकावर अश्लील कमेंट करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी राजस्थानच्या किशनगडमध्ये एका इस्रायली महिला पर्यटकावर अश्लील कमेंट करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.
अजमेरचे पोलीस अधीक्षक हर्षवर्धन अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला किशनगड डंपिंग यार्ड या प्रसिद्ध पर्यटन स्थळी भेट देण्यासाठी आली होती. तिथे ती व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना काही तरुणांनी तिच्यावर अश्लील आणि आक्षेपार्ह कमेंट्स केल्या.
या महिलेने नंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आणि पोलिसांपर्यंत पोहोचला. पोलिसांनी या घटनेची स्वतःहून दखल घेत (सुओ मोटो) आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला, असं एसपींनी सांगितलं.
आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक माहिती आणि गुप्तचरांच्या मदतीने या पथकाने घटनेत सामील असलेल्या तरुणांची ओळख पटवली आणि त्यांचा शोध घेतला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पोलिसांनी मोहम्मद फरहान (२५), मोहम्मद असीम (२१), फरहान (२४) आणि अख्तर अली (२२) या चार आरोपींना अटक केली आहे. हे चारही जण रामनेर रोड परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सध्या पोलीस या चारही आरोपींना ताब्यात घेऊन या घटनेसंदर्भात त्यांची कसून चौकशी करत आहेत, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.




