सार

सांगली लोकसभेचे ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगे यांना धमकी देण्यात आली आहे. ते सांगली लोकसभेतून निवडणूक लढवत आहेत. 

सांगली लोकसभा मतदारसंघातील ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगे यांना धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या गाडीवर शाही फेकत चपलांचा हार घालण्यात आला आहे. यावेळी त्यांना पत्र देण्यात आले असून यामध्ये छगन भुजबळने माघार घेतली, तू ही माघार घे, मराठ्यांच्या नादी लागू नको, अन्यथा अशी धमकी दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

काय घडला प्रकार? -
रविवारी हा प्रकार घडला आहे. ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या गाडीवर धमकीचे पत्रक लिहिले होते. त्यांच्या गाडीला चपलांचा हार घालण्यात आला असून त्याला काळे फासले होते. हॉटेल ग्रँड मराठासमोर त्यांची गाडी लावण्यात आली होती. अशा प्रकारचे धमकीसत्र चालू झाल्यामुळे प्रकाश शेंडगे राजीनामा देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

धमकी पत्रकात काय आहे?- 
प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर धमकीचा हा मेसेज लिहून पोस्टर चिकटवले होते. त्यात म्हटले आहे की, प्रकाश शेंडगे तुला मराठा समाज पडल्याशिवाय गप्पा बसणार नाही. जबळाने जशी नाशिक लोकसभा मतदार संघामध्ये माघार घेतली. तशी तू माघार घे आणि मराठ्यांच्या नादी लागू नका नाही तर तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. मराठ्याला विरोध केला तर पुढच्या वेळी चपलेला हार गळ्यात घालू, अशी धमकी या पत्रकावर लिहिली होती. 

कार्यकर्त्यांना शिवीगाळ - 
सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रकाश शेंडगे यांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी आणि शिवीगाळ करण्यात येत आहे.कवठेमहांकाळ तालुक्यातल्या खरशिंग गावात मराठा समाजातल्या तरुणांकडून ही दमदाटी व शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप ओबीसी नेते व सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.
आणखी वाचा - 
शरद पवारांचा 'निष्ठावंत' लागणार देवेंद्र फडणवीसांच्या गळाला? सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीला बसणार मोठा धक्का
कोण आहेत उज्ज्वल निकम, मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून तिकीट जाहीर