सार
देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अशातच RBI-SBI च्या रिपोर्ट्सनुसार, गेल्या 9 महिन्यादरम्यान (एप्रिल ते डिसेंबर 2023) क्रेडिट फ्लो मध्ये वाढ झाली आहे. गेल्या 9 महिन्यात क्रेडिट फ्लो 1.6 पटींना वाढला गेला आहे.
Credit Flow Growth in Last 9 Months : अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. अशातच गेल्या नऊ महिन्यादरम्यान (एप्रिल ते डिसेंबर 2023) क्रेडिट फ्लो वाढला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या नऊ महिन्यादरम्यान क्रेडिट फ्लो 1.6 पटींनी वाढला असून 22.8 ट्रिलियन रूपये झाला आहे, जो गेल्या वर्षातील आर्थिक वर्षाच्या समान कालावधीदरम्यान 1.14 ट्रिलियन रूपये होता. अशातच गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात क्रेडिट फ्लो 8.7 ट्रिलियन रूपयांची वाढ झाली आहे.
कोणत्या क्षेत्रात किती झाली वाढ?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या एका रिपोर्ट्सनुसार, गेल्या नऊ महिन्यादरम्यान (एप्रिल ते डिसेंबर 2023) कृषी आणि संलग्न क्षेत्रात 1.5 पटींनी वाढ (Agricultural and Allied Sectors), उद्योग क्षेत्रात 1.8 पट, MSME क्षेत्रात 1.7 पट, बांधकाम क्षेत्रात 6.2 पट, सर्व्हिस क्षेत्रात 1.4 पट आणि बिगर बँकिंग वित्त क्षेत्रात 0.6 पट राहिला आहे.
यंदाच्या जानेवारी महिन्यात GST पोहोचला 1.72 लाख कोटींच्या पार
जानेवारी, 2024 मध्ये जीएसटीच्या माध्यमातून सरकारची मोठी कमाई झाली आहे. अर्थमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2024 मध्ये जीएसटी कलेक्शन 10.4 टक्क्यांनी वाढून 1.72 लाख कोटी रूपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षात जानेवारीमध्ये (2023) जीएसटी कलेक्शन 1 लाख 55 हजार 922 कोटी रूपये होता. जानेवारी 2024 सातत्याने 12 वा महिना आहे, ज्यावेळी जीएसटीच्या कलेक्शनची आकडेवारी 1.5 लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे. जीएसटी कलेक्शनमध्ये वाढ झाल्याने अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले की, जीएसटीच्या आकडेवारीवरुन दिसते भारताची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे.
आणखी वाचा :
Budget 2024 : आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार अंतरिम अर्थसंकल्प, 11 वाजता सुरू होणार वाचन
कंत्राटी तत्वावरील महिला कर्मचाऱ्यांना मिळू शकते सशुल्क प्रसूती रजा, सरकारचे कंपन्यांना निर्देश