सार

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीवर 13 जणांनी काही दिवस गँगरेप केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

Crime News : ओडिशा (Odisha) येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) गँगरेप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगी विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे घरकाम करण्याचे काम करते. 

असा आरोप लावण्यात आला आहे की, पीडित मुलीच्या मित्रांसह काही जणांनी तिच्यावर काही दिवस गँगरेप केला. सध्या या प्रकरणात 11 जणांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

13 जणांनी गँगरेप केल्याचा आरोप
पोलिसांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ओडिशामधील 17 वर्षीय मुलीवर 13 जणांनी काही दिवस गँगरेप केला. यामधील 11 जणांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना 12 जानेवारी (2024) पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणातील अन्य दोन आरोपींचा अद्याप शोध घेतला जात आहे. आंध्र प्रदेशातील पोलिसांच्या मते, अल्पवयीन मुलीवर तिच्या मित्रांसह काहींनी तिच्यावर गँगरेप केला. याशिवाय पीडित मुलीला विशाखापट्टणम येथील आरके बीचवर मारहाण करून सोडून देण्याचाही प्रयत्न आरोपींकडून करण्यात आला. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 11 जणांना ताब्यात घेतले.

17 डिसेंबर (2023) पासून बेपत्ता होती पीडित मुलगी
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वीच पीडित मुलगी विखाशापट्टणम येथे आली होती. ती गेल्या 17 डिसेंबर (2023) पासून बेपत्ता झाली होती. यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

पीडित मुलगी 25 डिसेंबरला (2023) पोलिसांना भेटली. पण त्यावेळी पीडित मुलगी फार घाबरलेली होती. यानंतर 31 डिसेंबरला तिने आपल्या आई-वडिलांना तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितले. पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवला असून आरोपींना अटक केली आहे.

नक्की काय घडले?
पीडित मुलीने सांगितले की, ती विशाखापट्टणम येथील आरके बीचवर फिरायला गेली होती. येथे तिची भेट काही फोटोग्राफर्ससोबत झाली. यानंतर हे फोटोग्राफर्स तिला एका लॉजवर घेऊन गेले आणि तेथे तिच्यावर गँगरेप केला. यानंतर फोटोग्राफर्सच्या अन्य काही मित्रांनीही 22 डिसेंबरपर्यंत (2023) पीडित मुलीवर गँगरेप केला. या एकूणच प्रकारानंतर 23 डिसेंबरला आरोपींनी पीडित मुलीच्या हातात 200 रूपये टेकवून तिला सोडून दिले.

आणखी वाचा: 

Thane: नववर्षाआधी ठाणे पोलिसांची मोठी कारवाई, रेव्ह पार्टीतून 95 जणांना घेतले ताब्यात

धक्कादायक! प्रियकरासोबत पळाली अल्पवयीन मुलगी, रेल्वे ट्रॅकवर सापडले तरुणाच्या शरीराचे तुकडे

Thane Crime : पतीने संशयातून पत्नीसह मुलांची केली निर्घृण हत्या, तिहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं