Rajasthan New CM : राजस्थानमधील नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा, भजन लाल शर्मा यांच्या हाती असणारी राज्याची सूत्र

| Published : Dec 12 2023, 05:15 PM IST / Updated: Dec 26 2023, 12:15 PM IST

breaking news rajasthan new cm decision bjp announced Bhajanlal Sharma Chief Minister in rajasthan kpr
Rajasthan New CM : राजस्थानमधील नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा, भजन लाल शर्मा यांच्या हाती असणारी राज्याची सूत्र
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Rajasthan : राजस्थामधील नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा करण्यात आली आहे. भजन लाल शर्मा हे आता राजस्थानचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. जयपुरमध्ये भाजपच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विधीमंडळांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Rajasthan New CM : राजस्थानमध्ये नवा मुख्यमंत्री कोण होणार याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. मात्र आज (12 डिसेंबर, 2023) अखेर चर्चांना पूर्ण विराम मिळत राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने (BJP) भजन लाल शर्मा (Bhajan Lal Sharma) यांच्यांवर विश्वास ठेवत राजस्थानच्या राज्याची सूत्र त्यांच्या हाती दिली आहेत.

गेल्या काही आठवड्यापासून जयपुर ते दिल्लीत एकच प्रश्न उपस्थितीत केला जात होता की, राजस्थानचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? अखेर आज भाजपने विधीमंडळाच्या बैठकीत निर्णय जाहीर करत भजन लाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली आहे.

पहिल्यांदाच आमदार आणि आता थेट मुख्यमंत्री
मुख्यमंत्री झालेले भजन लाल शर्मा हे जयपुर मधील सांगानेर विधानसभेच्या जागेवरील आमदार आहेत. शर्मा यांच्यासाठी ही पहिलीच विधानसभा निवडणुक होती. म्हणजेच पहिल्यांदाच मुख्यंत्र्यांची खुर्ची मिळाली आहे.

  • भजन लाल शर्मा जिल्हा मोर्चाचे अध्यक्ष राहिले आहेत. पण आता ते मुख्यमंत्री झाले आहेत.
  • भजनलाल शर्मा हे मूळचे भरतपुर जिल्ह्यात राहणारे आहेत.
  • जयपुरच्या सांगानोर विधानसभेच्या जागेवरून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि पहिल्यांदाच ते जिंकले.
  • भजन लाल शर्मा हे सध्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आहेत.
  • भजन लाल शर्मा हे एकमेव असे प्रदेश सरचिटणीस आहेत, ज्यांनी तीन प्रदेशाध्यक्षांसोबत काम केले आहे.
  • भजन लाल शर्मा हे 55 वर्षांचे असून ते पदव्युत्तर आहेत.
  • प्रदेश सरचिटणीपूर्वी भजन लाल शर्मा हे भरतपुर जिल्ह्यातील जिल्हा मोर्चाचे अध्यक्षही राहिले आहेत.

मोदी-शाहांनी दिला सुखद धक्का
अशा प्रकारे मध्य प्रदेशात मोहन यादव आणि छत्तीसगढ मध्ये विष्णुदेव साय यांना मुख्यमंत्री करत भाजपने देशभरात आणि आपल्याच पक्षाच्या नेत्यांना सुखद धक्का दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत बड्या दिग्गज नेत्यांची नावे होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी यावेळीही भजन लाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

राजनाथ यांची आमदारांसोबत बातचीत
निरीक्षक म्हणून राजस्थानात पोहोचलेले राजनाथ सिंह यांनी आमदारांची बैठक सुरू होण्यापूर्वी सर्व जिंकलेल्या भाजपच्या आमदारांसोबत वन-टू-वन बातचीत केली. यावेळी राजनाथ सिंह यांनी प्रत्येकाला मुख्यमंत्री पदासाठीच्या नावाबद्दल विचारले. एवढेच नव्हे तर, भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांच्याशी देखील चर्चा केली होती.

आणखी वाचा: 

Madhya Pradesh New CM : मोहन यादव होणार मध्य प्रदेशाचे नवे मुख्यमंत्री, विधीमंडळाच्या बैठकीत निर्णय

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरलेत जगातील सर्वात लोकप्रिय नेते, 76% लोकांनी दर्शवली पसंती

Article 370 : जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याबाबत सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, सप्टेंबर 2024पर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश