सार

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील सत्तेची कमान कोण सांभाळणार याचा निर्णय अखेर झाला आहे. मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळमध्ये आज भाजपच्या विधीमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये मध्य प्रदेशाच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

Madhya Pradesh New CM: मध्य प्रदेशातील मुख्यमंत्र्यांची खुर्ची कोण सांभाळणार याबद्दलचा सस्पेंस अखेर संपला. भाजपच्या (BJP) विधीमंडळाच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्री पदासाठी मोहन यादव (Moham Yadav) यांचे नाव सहमतीने ठरविण्यात आले.यामुळे आता मध्य प्रदेशाचे नवे मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव कारभार सांभाळणार आहेत. मोहन यादव हे दक्षिण उज्जैन येथील आमदार आहेत.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शिवराज सिंह चौहान यांनी मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव विधीमंडळाच्या बैठकीत ठेवला होता. नव्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्रीपदासाठी लावल्या जाणाऱ्या अंदाजांना पूर्णविराम मिळाला आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयापूर्वी भाजपच्या हायकमांडने आज निरीक्षकांची एक टीम भोपाळमध्ये पाठवली होती. यामध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, आशा लाकडा आणि लक्ष्मण यांच्या नावांचा समावेश होता.

भोपाळला पोहोचल्यानंतर मनोहरलाल खट्टर आणि अन्य निरीक्षक हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. येथे आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम शिवराज सिंह यांची भेट घेतली. हे सांगितले जात आहे की, खट्टर भाजपच्या हायकमांडचा आदेश घेऊन दिल्लीत आले होते. खट्टर हे भोपाळला आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा सातत्याने त्यांच्या संपर्कात होते.

पक्षाच्या कार्यालयात ज्या ठिकाणी विधीमंडळाची बैठक सुरू होती तेथील कार्यालयाच्या बाहेर प्रल्हाद पटेल आणि शिवराज सिंह चौहान यांच्या समर्थकांकडून घोषणाबाजी केली जात होती.

मुख्यमंत्र्यांच्या पदासाठीच्या शर्यतीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत ज्योतिरादित्य सिंधिया, नरेंद्र सिंह तोमर, कैलाश विजयवर्गीय, प्रल्हाद पटेल आणि व्ही. डी. शर्मा यांच्या नावांचा समावेश होता. दुसऱ्या बाजूला. मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या घोषणेआधीच प्रल्हाद पटेल यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षिततेत वाढ करण्यात आली होती.

 मध्य प्रदेशाच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा झाल्यानंतर मोहन यादव यांच्या बहिणीने प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशात भाजपला विधानसभा निवडणुकीत बहुतम मिळाले होते. ज्या राज्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर होणार असल्याचे बोलले जात होते तेथेच काँग्रेसचा पराभव झाला. मध्य प्रदेशात भाजपला 163 जागांवर विजय मिळवता आला होता. तर काँग्रेसला 66 जागा मिळाल्या होत्या.

आणखी वाचा: 

Article 370 : जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याबाबत सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, सप्टेंबर 2024पर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश

‘आठवड्याला 70 तास काम’ : नारायण मूर्ती किती तास काम करायचे? स्वतःच दिली माहिती, म्हणाले…

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरलेत जगातील सर्वात लोकप्रिय नेते, 76% लोकांनी दर्शवली पसंती