एक दिवस रवी राणा भाजपमध्ये येतील, भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला गौप्य्स्फोट

| Published : Apr 01 2024, 07:37 PM IST

नवनीत राणा

सार

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवले आहे. नवनीत राणा यांना तिकीट मिळेल का नाही अशी शंका सुरुवातीला व्यक्त केली जात होती.

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवले आहे. नवनीत राणा यांना तिकीट मिळेल का नाही अशी शंका सुरुवातीला व्यक्त केली जात होती. भाजपने त्यांना पक्ष प्रवेश देऊन तिकीट जाहीर करून सर्वांना बुचकळ्यात टाकलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रवी राणा हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असे वक्तव्य केले आहे. 

रवी राणा लवकरच भाजपमध्ये येतील - 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी बोलताना मत व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं की, मी 2023 मध्ये जन्माष्टमीच्या दिवशी युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की यावेळी अमरावतीत कमळ चिन्हावर उमेदवार उभा असेल. आता रवी राणा युवा स्वाभिमान पक्षात आहेत. पण माझा अंबादेवीवर विश्वास आहे, नवनीत राणा एके दिवशी आदेश देतील आणि रवी राणा पण भाजपमध्ये येतील. . यंदा दोन ते तीन लाख मतांनी नवनीत राणा निवडून येतील आणि आमचा संकल्प आहे की 51 टक्के मतदान हे भाजपला होईल.

ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी - 
यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी असून त्यांना परत पंतप्रधान करणे हेच आपलं प्रमुख ध्येय असलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. भाजप संविधान बदलेल असं विरोधी पक्षांकडून सांगितलं जात आहे पण तस झालं नाही. काँग्रेसने अनेक वेळा संविधान बदलले असून आता नरेंद्र मोदी हे संविधानच संरक्षण करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 
आणखी वाचा - 
माढा लोकसभा मतदारसंघातून प्रवीण गायकवाड महाविकास आघाडीकडून लढणार, शरद पवारांनी तयारीला लागण्याचे दिले आदेश
महादेव जानकर यांच्यासाठी नरेंद्र मोदींचा संदेश घेऊन आलो आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीच्या सभेत दिला शब्द