सार

भारतीय जनता पार्टी जनतेपर्यंत पोहचण्यासाठी विविध फंडे शोधून काढत असून मर्चन्डाईजचा त्यामध्ये भर पडली आहे. 

भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नवीन फंडे शोधून आणून लोकांपर्यंत पोहचण्याचे मार्ग शोधले आहेत. आता मर्चन्डाईजच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचून भाजप प्रचार करणार आहे. या मर्चन्डाईजवर भाजपने वेगवेगळ्या पद्धतीने प्रचाराला सुरुवात करून टाकलेली आपल्याला दिसून येते.

या मर्चन्डाईजमध्ये खासकरून "अब की बार 400 पार" आणि "फिर एक बार मोदी सरकार," "मोदी की हमी," आणि "मोदी है तो मुमकिन है" अशा लोकप्रिय घोषणांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपने लोकप्रिय घोषणांचा यामध्ये समावेश करून प्रचारात रंगत आणली आहे.

यामध्ये खास करून भगव्या रंगाचा समावेश करण्यात आला असून यामुळे भाजपचा मूळ मुद्दा हिंदुत्व येथे अधोरेखित केले जात आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे मोदी का परिवार हे खासकरून दिसून येत आहे. संपूर्ण भारत माझा देश असून तेथील लोक माझा परिवाराचं असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. टी-शर्ट, मग, कॅप्स, बॅज, स्टेशनरी, स्टिकर्स, फ्रिज मॅग्नेट यासारख्या प्रकारांमध्ये मर्चन्डाईज उपलब्ध असून त्यामुळे प्रचाराला रंगत येणार आहे.
आणखी वाचा - 
गडचिरोली येथे चार नक्षलवादी ठार, लोकसभा निवडणुकीवेळी गडबड करण्याचा रचला होता कट
Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या घोषणेआधी काँग्रेसचा मोठा निर्णय, सांगली येथून विशाल पाटील यांना उतरवण्याचा निर्णय