सार

भाजपने मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून उज्ज्वल निकम यांना तिकीट जाहीर केले असून पूनम महाजन यांचे तिकीट कापले आहे. 

भाजपने शनिवारी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या मतदारसंघातून भाजपच्या पूनम महाजन या खासदार होत्या. 

निकम यांना उमेदवारी देण्याचा निर्णयाच्या वेळी पूनम महाजन अनुपस्थित- 
खासदार पूनम महाजन यांचे वडील प्रमोद महाजन यांच्या खून खटल्यात प्रमोद महाजन हे सरकारी वकील होते. पूनम महाजन यांनी दोन टर्म खासदार म्हणून काम पहिले. त्यांच्याकडे भाजपच्या युवा मोर्चाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांची युवा वर्गामध्ये मोठी क्रेझ होती. पण त्यांना आता तिकीट नाकारल्यामुळे त्या कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. 

पूनम महाजन यांचे तिकीट कापण्यात यावे अशी बऱ्याच दिवसांपासून चर्चा चालू होती. त्यांच्या तिकिटाबाबतचा निर्णय भाजपच्या संघटनात्मक पातळीवर घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.काँग्रेसने यावर टीका करताना भाजप ग्राउंड पातळीवरील कार्यकर्त्यांचा विचार करत नसल्याचा आरोप होत आहे. 

काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना तिकीट जाहीर - 
काँग्रेसने मुंबई उत्तर मध्यमधून शहर विभाग प्रमुख आणि धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांना काँग्रेसने लोकसभा तिकीट जाहीर केले आहे. या ठिकाणी उमेदवारांची यादी काँग्रेस आणि भाजपने तिकीट जाहीर केले आहे. वर्षा गायकवाड यांना तिकीट देण्यात यावे याबाबत कार्यकर्ते नाराज होते. पण अखेर त्यांना पक्षाने तिकीट जाहीर केले आहे. 

उज्ज्वल निकम यांनी कसाबच्या केसमध्ये सरकारी वकील म्हणून काम केलं होते. त्यांनी कसाबच्या केसमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. उज्ज्वल निकम यांनी इतर अनेक केसमध्ये सरकारी वकील म्हणून काम केलं. त्यांना तिकीट दिल्यामुळे येथील लढत रंगतदार होणार आहे. 
आणखी वाचा - 
अरविंद केजरीवाल यांचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रः लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मदत करण्यासाठी ईडीने केली अटक
लोकसभा निवडणूक: हेलिकॉप्टरमध्ये बसताना ममता बॅनर्जी पडल्या, झाली पायाला दुखापत पाहा व्हिडिओ