‘आठवड्याला 70 तास काम’ : नारायण मूर्ती किती तास काम करायचे? स्वतःच दिली माहिती, म्हणाले…

| Published : Dec 09 2023, 04:50 PM IST / Updated: Dec 09 2023, 04:59 PM IST

narayana murthy
‘आठवड्याला 70 तास काम’ : नारायण मूर्ती किती तास काम करायचे? स्वतःच दिली माहिती, म्हणाले…
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

नारायण मूर्ती यांनी आठवड्यामध्ये 70 तास काम करण्याच्या त्यांच्या सल्ल्याचे पुन्हा समर्थन केल्याचे दिसले. एका मुलाखतीदरम्यान ते म्हणाले की, ‘गेल्या 40 वर्षांपासून आठवड्यात 70 तास काम करण्याचा नियम मी पाळत आलो आहे. हेच माझ्या यशाचे रहस्य आहे’.

 

Narayan Murthy News : इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्यात 70 तास काम करण्याच्या सल्ल्याचे पुन्हा एकदा समर्थन केले आहे. हा सल्ला पटवून देण्यासाठी त्यांनी स्वतःच्याच आयुष्याचे उदाहरण मांडण्याचा प्रयत्न केला. 

‘इकोनॉमिक टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत नारायण मूर्ती यांनी म्हटलं की, “माझ्या 40 वर्षांच्या करिअरमध्ये मी एका आठवड्यामध्ये 70 तास काम करत होतो आणि हेच माझ्या यशाच्या रहस्य आहे. सकाळी 6 वाजून 20 मिनिटांपासून ते रात्री 8 वाजून 30 वाजेपर्यंत मी काम करायचो. इन्फोसिस कंपनीच्या स्थापनेपासूनच मी या पद्धतीच्या कार्यसंस्कृतीचे पालन केले”.

नारायण मूर्ती वर्क कल्चरबाबत नेमके काय म्हणाले?

नारायण मूर्ती यांनी स्वतःचे उदाहरण देत सांगितले की, मी आठवड्यातील सहा दिवस काम करतो. सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी मी कामास सुरुवात करायतो ते रात्री 8 वाजून 30 मिनिटांपर्यंत माझे काम सुरू असायचे. तसेच आज जे देश समृद्धशाली झाले आहेत, त्यामागे अशा प्रकारचे कठीण परिश्रम असतात.

दरम्यान जीवनात मिळालेल्या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या आईवडिलांना देत त्यांचे आभार मानले. याबाबत ते म्हणाले की, “आईबाबांनी लहानपणापासूनच जास्तीत जास्त वेळ काम करण्यासाठी प्रेरणा दिली. गरिबीतून बाहेर पडायचे असेल तर जास्त वेळ काम करावे लागेल, अशी शिकवण मला वडिलांनी दिली. जितके जास्त तास काम कराल, तितकीच कामातील उत्पादनक्षमता वाढेल, असा कानमंत्र त्यांनी मला दिला होता”.

नारायण मूर्तींनी आपल्या यशाचे सांगितले रहस्य

नारायण मूर्तींनी म्हटलं की, “आपल्या व्यावसायिक जीवनात नेहमीच आठववड्यामध्ये 70 तास काम केले आहे. वर्ष 1994दरम्यान आठवड्यातील सहा दिवसांत 85 ते 90 तास मी काम करायचो. यामुळे कोणत्याही प्रकारे नुकसान झाले नाही”. 

काही दिवसांपूर्वी नारायण मूर्ती यांनी इन्फोसिस कंपनीचे माजी सीएफओ मोहनदास पै यांच्यासह बातचित करताना देशातील तरुण मंडळींंना एका आठवड्यात 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. या मुद्याची देशभरात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यांच्या या विधानास काहींनी विरोध तर काहींनी पाठिंबा दर्शवला. यानंतर पुन्हा एकदा नारायण मूर्ती यांनी आपल्या याच वाक्याचे समर्थन केल्याचे पाहायला मिळाले.

आणखी वाचा :

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरलेत जगातील सर्वात लोकप्रिय नेते, 76% लोकांनी दर्शवली पसंती

VIDEO : सोशल मीडियावर अशी पोस्ट शेअर केल्यास होणार कडक कारवाई, पोलिसांनी जारी केले गाइडलाइन्स

Javeria Khanum : जवेरियाचा भारतीय तरुणाला लव्हेरिया! आणखी एक पाकिस्तानी तरुणी होणार भारताची सून