सार

बंगळुरूतील एका व्यक्तीने सोशल मीडियावर त्याच्या घरात गढूळ पाणी पुरवठा केला जात असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, नळातून सांबार पुरवला जातोय का?

Viral Video : बंगळुरूतील (Bengaluru) शोभा एरेना अपार्टमेंटला (Sobha Arena Apartment) पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशातच इमारतीतील नागरिकांना कशा प्रकारच्या पाणी पुरवठा केला जातोय याचाच एक व्हिडीओ तेथील स्थानिक व्यक्तीने शेअर केला आहे.

धनंजय पद्मनाभचर (Dhananjaya Padmanabhachar) या व्यक्तीने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X'वर घरातील नळाला येणाऱ्या पाण्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. व्हिडीओमध्ये दिसतेय की, नळातून मातीचे पाणी (Muddy Water) येत आहे. 

धनंजय पद्मनाभचर याने पोस्टमध्ये लिहिलेय की, शोभा एरेना इमारतीत येणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेकडे पाहावे. याशिवाय पोस्टमध्ये त्याने कर्नाटकाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महापालिकेचे आयुक्त यांना देखील टॅग केले आहे.

नेटकऱ्यांनी दिल्यात अशा प्रतिक्रिया
7 फेब्रुवारीला शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओला आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

एका युजर्सने म्हटले की, "एका क्षणासाठी वाटले नळातून सांबार पुरवला जातोय. हे खरंच वाईट आहे." दुसऱ्याने म्हटले की, "पाण्याची टाकी स्वच्छ केल्यानंतर अशाप्रकारचे पाणी येते." तिसऱ्याने म्हटले की, "नळातील पाणी टोमॅटोचे सूप असल्यासारखे वाटत आहे. हाच खरा विकास आहे."

आणखी वाचा : 

कर्नाटकातील रायचूर येथे भगवान विष्णूंच्या मूर्तीसह सापडले शिवलिंग, पाहा VIDEO

पेपर फुटीला आता बसणार चाप, लोकसभेत पारित झालेल्या विधेयकाबद्दल जाणून घ्या सविस्तर

PM Modi in Goa : भारतात पुढील पाच वर्षात उर्जा क्षेत्रात 67 अब्ज डॉलर्सची होणार गुंतवणूक, वाचा गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले