सार

Rameshwaram Cafe : बेंगळुरूच्या कुंडलहल्ली येथील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या गूढ स्फोटाने बंगळुरू हादरले आहे. सविस्तर अपडेट लवकरच

Rameshwaram Cafe : बेंगळुरूच्या कुंडलहल्ली येथील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या गूढ स्फोटाने बंगळुरू हादरले आहे. बंगळुरूच्या कुंडलहल्ली येथील रामेश्वरम कॅफेमध्ये (Rameshwaram Cafe) झालेल्या गूढ स्फोटाने बंगळुरू हादरले. या स्फोटात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटात जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
Rameswaram Cafe.... What happened? pic.twitter.com/NY7JU5bebN

या घटनेने पोलिसांच्या चिंतेत भर पडली असून, पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. पोलिस तपासात एका बॅगेत लपवलेल्या एका गूढ वस्तूचा अचानक स्फोट झाल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे गर्दीच्या कॅफेमध्ये गोंधळ उडाला. या स्फोटात केवळ पाच जण गंभीर जखमी झाले असून परिसराचेही मोठे नुकसान झाले आहे.

पोलिसांच्या अहवालानुसार, अज्ञात व्यक्तीने एक बॅग आणली होती, त्यामध्ये स्फोट झाला. स्फोटामुळे घटनास्थळी आग लागली, त्यामुळे कॅफेचे मोठे नुकसान झाले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले.
आणखी वाचा - 
Lok Sabha Election 2024 : 20 कोटी नवीन मतदारांसाठी 'माझे पहिले मत देशासाठी' मोहीम झाली सुरु
UPA vs NDA: 10 वर्षांत अन्नधान्याची सरकारी खरेदी 761.40 वरून 1062.69 लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढली, 1.6 कोटी शेतकऱ्यांनी घेतला फायदा
UPA vs NDA: 9 वर्षात 20 शहरांमध्ये 905 किलोमीटरचे मेट्रो जाळे, 2014 पूर्वी फक्त 5 शहरांमध्ये होती मेट्रो सुविधा