सार

बंगळुरूमधील स्टार्टअप कंपनी Mindful AI Labची संस्थापक आणि सीईओ असलेल्या सूचना सेठ नावाच्या महिलेने आपल्याच मुलाची गोव्यात हत्या केल्याची धक्कादाक बातमी समोर आली आहे. याशिवाय हत्येनंतर मुलाचा मृतदेह बॅगेत भरून पळ काढण्याचा प्रयत्नही महिलेने केला. 

Crime News : बंगळुरूमधील (Bengaluru) स्टार्टअप कंपनी Mindful AI Labची संस्थापक आणि सीईओ असलेल्या सूचना सेठने (Suchana Seth) गोव्यात आपल्याच निष्पाप मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सूचना आपल्या चार वर्षाच्या मुलाला घेऊन गोव्यातील (Goa) एका हॉटेलमध्ये थांबली होती.

ज्या हॉटेलमध्ये सूचना होती तेथेच तिने मुलाचा जीव घेतल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय मुलाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह बॅगेत भरून पळ काढण्याचा प्रयत्नही सूचनाने केला. या प्रकरणात आता गोवा पोलिसांनी सूचनाला अटक केली आहे.

महिलेचा गोवा ते कर्नाटक प्रवास
सूचना उत्तर गोव्यातील कांदोळीतील एका हॉटेलमध्ये थांबली होती. 39 वर्षीय सूचना सेठला अटक होण्यापूर्वी ती मुलाचा मृतदेह घेऊन गोव्यावरून कर्नाटकाच्या दिशेने निघाली होती. कर्नाटकात आल्यानंतर सोमवारी चित्रदुर्ग येथे सूचनाला पोलिसांकडून अटक करण्यात आली. यावेळी तिच्याकडे असलेल्या बॅगमधील मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

वडील आणि मुलाची भेट होऊ नये म्हणून केली हत्या
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे आपल्या पतीसोबत वाद सुरू आहेत. याशिवाय या दोघांमधील वाद कोर्टापर्यंत पोहोचल्याचेही सांगण्यात आले आहे. कोर्टाने आदेश दिला होता की, मुलगा वडिलांना भेटू शकतो. पण मुलाने वडिलांना भेटणे महिलेला मान्य नव्हते. यामुळे महिला मुलाला घेऊन गोव्यात आली आणि शनिवारी (6 जानेवारी) त्याची हत्या केली.

टॅक्सीने करणार होती प्रवास
सूचना सेठने शनिवारी आपल्या मुलासह कांदोळीतील सोल बन्यान ग्रांडे (Sol Banyan Grande) हॉटेलमध्ये थांबली होती. सोमवारी (8 जानेवारी) सूचना एकटीच खोलीतून बाहेर पडली आणि हॉटेलच्या कर्मचाऱ्याला तिने टॅक्सीचे बुकिंग करण्यास सांगितले.

हॉटेल कर्मचाऱ्याने सूचनाला टॅक्सीऐवजी विमानाने प्रवास करा असा सल्लाही दिला. पण सूचनाने तिला टॅक्सीनेच प्रवास करायचा असल्याचे हॉटेल कर्मचाऱ्याला म्हटले होते.

पोलिसांनी असा लावला गुन्ह्याचा छडा
सुचना मिळाल्यानंतर गोवा पोलिसांनी तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. बंगळुरूला महिलेला घेऊन जाणाऱ्या टॅक्सी चालकाला पोलिसांनी फोन केला. यावेळी पोलिसांनी चालकाला महिलेला तिच्या मुलाबद्दल विचारण्यास सांगितले. यावेळी महिलेने तिचा मुलगा एका मित्रासोबत असल्याचे चालकाला सांगितले. याशिवाय महिलेने मित्राचा पत्ता देखील दिला.

पोलिसांनी अधिक तपास केला असता कळले की, महिलेने दिलेला मित्राचा पत्ता खोटा होता. यानंतर पोलिसांनी पुन्हा टॅक्सी चालकाला फोन केला असता तोपर्यंत त्यांनी गोव्याची हद्द ओलांडली होती. पण यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी चालकासोबत कोकणी भाषेत संवाद साधला तो महिलेला कळला नाही. 

पोलिसांनी चालकाला आपला मार्ग बदलून एखाद्या जवळच्या पोलीस स्थानकात घेऊन जाण्यास सांगितले. टॅक्सी चालकाने महिलेला जवळच्या पोलीस स्थानकात घेऊन गेला आणि तिला तेथे अटक करण्यात आली. याशिवाय महिलेकडे असलेल्या बॅगेतील मुलाचा मृतदेह देखील ताब्यात घेतला.

आणखी वाचा : 

मॉडेल दिव्या पाहुजा हत्येतील आरोपींना अटक, पण मृतदेहाचा शोध लागेना

अल्पवयीन मुलीवर 13 जणांनी केला सामूहिक बलात्कार, हत्येचाही केला प्रयत्न

सोशल मीडियावरील पोस्ट Like करणे इंजिनिअर तरुणाला पडले महागात, गमावले 20 लाख रूपये