सार
बीड लोकसभेचे खासदार म्हणून बजरंग सोनवणे यांची निवड झाली असून येथील मतदानाच्या फेऱ्या उशिरा पूर्ण झाल्या आहेत. येथे त्यांनी भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना हरवले असून हा त्यांच्यासाठी खूप मोठा विजय मानला जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालात यावर्षी वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसून आल्या आहेत. काही ठिकाणचे निकाल रात्री फार उशिरापर्यंत लागले नव्हते, पण ते जाहीर झाल्यानंतर निवडून आलेल्या पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. बीडमधील निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालल्याचे दिसून आले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनावणे यांनी विजयी जल्लोष केला आहे.
पाटोदा तालुक्यातील गावांची निर्णायक भूमिका -
पहिल्या फेरीपासूनच बीड लोकसभा मतदारसंघात चुरस पाहायला मिळाली. येथे भाजपाकडून पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पक्षाकडून निलेश लंके यांना तिकीट देण्यात आले होते. पंकजा मुंडे यांची ३८ हजार मतांची आघाडी मोडून काढली. त्यामुळे बजरंग सोनवणे निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हेरच्या १५ फेऱ्यांमधील लढत रंजक झाली आहे. येथे मराठा मतदारांची भूमिका निर्णायक ठरल्याचे दिसून आले आहे.
बीड लोकसभा मतदारसंघाची नाट्यमय मतमोजणी
पहिली फेरी - बंजरंग सोनवणे 1359 मतांनी आघाडीवर
दुसरी फेरी - बजरंग सोनवणे 2349 मतांनी आघाडीवर
सहावी फेरी - बजरंग सोनवणे 1387 मतांनी आघाडीवर
सातवी फेरी - बजरंग सोनवणे 203 मतांनी आघाडीवर
दहावी फेरी - पंकजा मुंडे 11955 मतांनी आघाडीवर
11 वी फेरी - पंकजा मुंडे 2111 मतांनी आघाडीवर
12 वी फेरी - बजरंग सोनवणे 1644 मतांनी आघाडीवर
13 वी फेरी - बजरंग सोनवणे 6473 मतांनी आघाडीवर
15 वी फेरी - पंकजा मुंडे 3093 मतांनी आघाडीवर
18 वी फेरी - पंकजा मुंडे 24099 मतांनी आघाडीवर
19 वी फेरी - पंकजा मुंडे 24361 मतांनी आघाडीवर
20 वी फेरी - पंकजा मुंडे 16482 मतांनी आघाडीवर
21 वी फेरी - पंकजा मुंडे 33623 मतांनी आघाडीवर
22 वी फेरी - पंकजा मुंडे 38303 मतांनी आघाडीवर
23 वी फेरी - पंकजा मुंडे 34705 मतांनी आघाडीवर
24 वी फेरी - पंकजा मुंडे 30461 मतांनी आघाडीवर
25 वी फेरी - पंकजा मुंडे 22421 मतांनी आघाडीवर
26 वी फेरी - पंकजा मुंडे 10276 मतांनी आघाडीवर
27 वी फेरी - पंकजा मुंडे 7408 मतांनी आघाडीवर
28 वी फेरी - बजरंग सोनवणे 932 मतांनी आघाडीवर
29 वी फेरी - बजरंग सोनवणे 1217 मतांनी आघाडीवर
30 वी फेरी - बजरंग सोनवणे 2602 मतांनी आघाडीवर
31 वी फेरी - बजरंग सोनवणे 2688 मतांनी आघाडीवर"
आणखी वाचा -
एनडीए आघाडी करणार सरकार स्थापनेचा दावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमार आणि नायडू यांच्याशी साधला संपर्क
पंतप्रधान पदाचा उमेदवार उद्या ठरणार, पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी केले वक्तव्य