बेंगळुरूच्या एका लॉजमध्ये झालेल्या भांडणात बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला खिडकीतून ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुंबई : २३ वर्षीय तरुणीचा तिच्या बॉयफ्रेंडसोबतच्या भांडणादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. बेंगळुरू येथील एका लॉजमध्ये बॉयफ्रेंडने तिला खिडकीतून खाली ढकलल्याचा आरोप आहे, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. ही घटना १९ नोव्हेंबरला गंगम्मागुडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, संतापाची लाट उसळली आहे. मृत तरुणीचे नाव ऐश्वर्या असून ती मूळची हसन जिल्ह्याची आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या संतोष नावाच्या आरोपीला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Trigger Warning: खालील व्हिडीओ विचलित करणारा असू शकतो.

Scroll to load tweet…

बेंगळुरूच्या लॉजमध्ये नेमकं काय घडलं?

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या आणि संतोष रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, ऐश्वर्याच्या वैयक्तिक आयुष्यात आधीपासूनच काही अडचणी सुरू होत्या. एका दुसऱ्या तरुणासोबतच्या तिच्या आधीच्या एका घटनेवरून कुटुंबीयांनी तिला जाब विचारला होता.

तक्रारीत म्हटल्यानुसार, ऐश्वर्या अरुंधतीच्या बॉयफ्रेंडचा मित्र असलेल्या सचिनसोबत एका ओयो रूममध्ये गेली होती. त्यानंतर अरुंधतीने ऐश्वर्याच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. यावरून तिच्या घरच्यांनी तिला बरे वाईट सुनावले होते.

या घटनेमुळे ऐश्वर्या आणि संतोषच्या नात्यातही दुरावा आला. संतोष तिच्यावर विश्वास ठेवत नव्हता. या सर्व प्रकारामुळे ऐश्वर्या प्रचंड तणावात होती, असे अधिकाऱ्याने तक्रारीचा हवाला देत सांगितले.

Scroll to load tweet…

भांडणाचे रुपांतर हत्येत

१९ नोव्हेंबर रोजी ऐश्वर्या आणि संतोष बेंगळुरूमधील एका लॉजवर गेले होते. संध्याकाळी दोघांनी दारू पिली आणि त्यानंतर त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडणादरम्यान ऐश्वर्याने संतोषला सुनावले की, तू आणि माझे घरचे कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाही. तिने आपण जीव देणार असल्याचेही सांगितले.

यावर आरोपीने 'तुला जे करायचे ते कर' असे म्हणत तिला हाताने जोरात धक्का दिला. या धक्क्यामुळे ऐश्वर्याचा तोल गेला आणि ती लॉजच्या खिडकीतून खाली पडली.

खाली पडल्याने तिला गंभीर दुखापत झाली आणि यातच तिचा मृत्यू झाला.

हत्येचा गुन्हा दाखल, आरोपी अटकेत

सुरुवातीला या मृत्यूचा तपास अपघात म्हणून सुरू होता. पण, नंतर तरुणीच्या आईने तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून संतोषला अटक केली.

तरुणीच्या मृत्यू प्रकरणी आरोपीला कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा सविस्तर क्रम आणि कारणे शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

(एजन्सीच्या इनपुटसह)