सार
Bangladesh MP killed in Kolkata : बांग्लादेशातील खासदाराची भारतात हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. खरंतर, खासदार गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते आणि त्यांचे अखेरचे लोकेशन बिहारमध्ये सापडले आहे.
Missing Bangladesh MP Murdered : भारतात बेपत्ता झालेले बांग्लादेशातील खासदार अनवारुल अजीम अनार (Anwarul Azim) यांची कोलकाता येथे कथित रुपात झाल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणासंबंधित तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. बांग्लादेशाचे गृहमंत्री असदुज्जमां खान यांनी बुधवारी (22 मे) या प्रकरणाची माहिती दिली आहे. असदुज्जमां खान यांनी पत्रकारांशी बातचीत करताना म्हटले की, "भारतात बेपत्ता झालेले बांग्लादेशातील खासदार अनवारुल यांची कोलकाता येथील एका फ्लॅटमध्ये हत्या करण्यात आली. आम्हाला मिळाल्या माहितीनुसार हत्येतील सर्व आरोपी बांग्लादेशी आहेत. खरंतर ही एक नियोजित कट आहे."
दरम्यान, भारतातील पोलीस देखील खासदाराच्या हत्येप्रकरणात मदत करत असल्याचे मंत्र्यांनी म्हटले आहे. याशिवाय पंतप्रधान शेख हसीना यांनी खासदारांच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
तीन वेळा खासदार राहिलेले आणि अवामी लीगच्या कालीगंज उपजिल्हा युनिटचे अध्यक्ष अनवारुल अनार उपचारासाठी 12 मे ला भारतात खासगी दौऱ्यासाठी आले होते. उत्तर कोलकाता येथील बरानगर येथे 18 मे सा अनवारुल बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. अशातच दिल्ली येथील बांग्लादेशाच्या दूतवासाने बांग्लादेशातील प्रेस मंत्री शाबान महमूद यांनी म्हटले की, भारत आमचा जुना आणि विश्वासू मित्रदेश आहे. आम्ही भारतीय अधिकाऱ्यांकडून अधिक माहितीची अपेक्षा करत आहोत.
सीआयडीने हत्येचा व्यक्त केला संशय
बांग्लादेश सरकारने अनवारुल अजीम अनवर यांची हत्या झाल्याची घोषणा केल्याच्या काही तासानंतर पश्चिम बंगालच्या पोलिसांनी खासदारांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवला. सीआयडीचे महानिरीक्षक अखिलेश चतुर्वेदी यांनी म्हटले की, खासदारांची हत्या झाल्याची ठोस माहिती आमच्याकडे आहे. पण बंगालच्या पोलिसांकडून सध्या बांग्लादेशातील खासदारांचा मृतदेह ताब्यात घेऊ शकत नाही.
खासदारांच्या कोलकाता दौऱ्याबद्दल माहिती नाही
अखिलेश चतुर्वेदी यांनी पुढे म्हटले की, आम्हाला बांग्लादेशातील खासदार कोलकाता येथे आले आहेत याची माहिती नव्हती. पण अनवारुल यांच्या ओखळीचे खासदार गोपाल बिस्वास यांनी 18 मे ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली असता कळले. बैराकपुर पोलीस आयुक्तालयाने खासदारांच्या तपासासाठी एक विशेष तपास पथक तयार केले. 20 मे ला आम्हाला परराष्ट्र मंत्रालयाकडून एक सुचना मिळाली आणि बुधवारी एक माहिती मिळाल्याने असा संशय निर्माण होतोय की, खासदारांची हत्या झाली आहे.
खासदारांसोबत दोन पुरुष आणि एक महिला
पीटीआयनुसार पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, ज्यावेळी अनवर यांनी अपार्टमेंटमध्ये एण्ट्री केली असता त्यांच्यासोबत दोन पुरुष आणि एक महिला होती. सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले असता की, अज्ञात पुरुष आणि महिला 15 मे ते 17 मे दरम्यान अनेकदा फ्लॅटमधून बाहेर आले. पण त्यांच्यासोबत खासदार दिसले नाहीत. पोलिसांनी म्हटले की, खासदारांसोबत फ्लॅटमध्ये गेलेले तिघांपैकी दोघेजण नंतर बांग्लादेशात परतले.
आणखी वाचा :
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजकीय वारस कोण?, स्वत:च केलं जाहीर; म्हणाले...
लैंगिक अत्याचार प्रकरणात जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना जामीन मंजूर