बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारतीय सैन्य मोठ्या युद्धासाठीही तयार होते? माजी हवाई दल प्रमुखांनी केला मोठा खुलासा

| Published : Apr 23 2024, 11:07 AM IST / Updated: Apr 23 2024, 11:24 AM IST

Rks bhadauria
बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारतीय सैन्य मोठ्या युद्धासाठीही तयार होते? माजी हवाई दल प्रमुखांनी केला मोठा खुलासा
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Balakot Airstrike : माजी हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी म्हटले की, आम्ही प्रत्येक स्थितीसाठी तयार होतो. एखाद्याने आमच्या देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तो जेथे कुठे लपला असला तरीही त्याला निशाण्यावर घेतले जाईल.

Balakot Airstrike: माजी भारतीय हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. एएनआयसोबत बोलताना भाजप सरकारचे कौतुकही भदौरिया यांनी केले. याशिवाय पाकिस्तानच्या हवाई दलासह सैन्याच्या सुरक्षितेता भेदून बालाकोट हवाई हल्ला करण्यात आला होता. यामुळे भारताचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे आरकेएस भदौरिया यांनी एएनआयला सांगितले.

आम्ही दहशतवाद खपवून घेणार नाही- आरकेएस भदौरिया
भाजप नेते आणि माजी हवाई दल प्रमुख आरकेअस भदौरिया यांनी म्हटले की, आम्ही दहशतवाद अजिबात खपवून घेणार नाही. ज्यावेळी भाजप सत्तेत आला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवादाविरोधात झिरो टॉलेरेंसचे धोरण स्पष्ट केले होते. ज्यावेळी एखादी दहशतवादी घटना झाली अथवा गुन्हेगार सीमेच्या पलीकडे लपले गेले तेव्हा नियंत्रण रेषेच्या पार सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला.

दुसऱ्या बाजूला पुलवामा हल्ला झाल्यानंर सीमेच्या पार लाँचपॅड अंडर ग्राऊंड झाले. त्यांना शोधून काढण्यात आले. त्यावेळी बालाकोट हवाई हल्ला करण्यात आला होता. खरंतर हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आणि एक मोठा मेसेज होता. त्यानंतर कोणतीही दहशतवादी घटना घडली नसल्याचेही आरकेएस भदौरिया यांनी सांगितले.

भारतीय सैन्य मोठ्या युद्धासाठी तयार होते?
भदौरिया यांना भारतीय सैन्य मोठ्या युद्धासाठी तयार होते का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर भदौरिया यांनी उत्तर देत म्हटले की, “हो नक्कीच. ज्यावेळी अशी पावले उचलली जातात तेव्हा सर्व मुद्द्यांकडे पाहिले जाते. सर्वप्रकारची तयारी केली जाते. आम्ही पाकिस्तानच्या हवाई दलासह सैन्याला भेदून बालाकोट हवाई हल्ला केलाच. पण दहशतवाद्यांची ठिकाणेही नष्ट केलीत. त्यावेळी आम्ही प्रत्येक स्थितीसाठी तयार होतो.”

कोण आहेत आरकेएस भदौरिया?
माजी हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया उत्तर प्रदेशात राहणारे आहेत. भदौरिया यांनी सप्टेंबर, 2019 ते सप्टेंबर 2021 पर्यंत हवाई दलाच्या प्रमुखाच्या रुपात काम केले. सैन्य प्रमुखाची जबाबदारी सांभाळण्याआधी आरकेएस भदौरिया यांनी हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली होती. खरंतर भदौरिया पुण्यातील एनडीएचे विद्यार्थी होती. याशिवाय भदौरिया यांना 26 प्रकारच्या लढाऊ विमानांचा अनुभवही आहे. भदौरिया यांनी आपल्या 36 वर्षांच्या करियरदरम्यान अनेक पुरस्काराने गौरवण्यातही आले आहे.

आणखी वाचा : 

Schengen Visa : भारतीयांना युरोपातील 29 देशांत फिरणे होणार सोपे, युरोपीय युनियनकडून व्हिसाच्या नियमांत बदल

हमालाचा पोरगा झाला UPSC ऑफिसर, किचनमध्ये राहून केला अभ्यास