सार
Ramcharitmanas : तुलसीदास लिखित 'श्रीरामचरितमानस'च्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
Ramcharitmanas : तुलसीदास लिखित 'श्रीरामचरितमानस'च्या (Ramcharitmanas) मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी श्री राम मंदिराचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यापूर्वी 'श्रीरामचरितमानस'ची मागणी वाढल्याचे दिसत आहे.
वाढत्या मागणीमुळे उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे धार्मिक पुस्तकांचे सर्वात मोठे प्रकाशक असलेल्या गीता प्रेसमध्ये तुलसीदास लिखित 'श्रीरामचरितमानस'च्या (Ramcharitmanas) प्रती कमी पडत आहेत. 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच गीता प्रेस 'रामचरितमानस'च्या प्रतींची छपाई करण्याकरिता रात्र-न्-दिवस चालवली जात आहे.
गीता प्रेसचे व्यवस्थापक काय म्हणाले?
याबाबत अधिक माहिती देताना गीता प्रेसचे व्यवस्थापक लालमणी त्रिपाठी म्हणाले की, रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख जाहीर झाल्यापासून हनुमान चालिसा व सुंदर कांडसह रामचरितमानस ग्रंथाच्याही मागणीत वाढ झाली. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही दर महिन्याला रामचरितमानसच्या (Ramcharitmanas) जवळपास 75 हजार प्रती प्रकाशित करत होतो. यंदाच्या वर्षी एक लाख प्रती छापल्या, पण सध्या प्रती उपलब्ध नाहीत.
लालमणी त्रिपाठी पुढे असेही म्हणाले की, “जयपूरमधून रामचरितमानस ग्रंथाच्या (Ramcharitmanas) 50 हजार प्रती तर भागलपूरहून 10 हजार प्रती मागवण्यात आल्या होत्या. पण आम्ही या ऑर्डर पूर्ण करू शकत नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे प्रेसमध्ये जागेची कमतरता भासत आहे. 22 जानेवारीनंतर अयोध्येत मोठी गर्दी होईल तेव्हा देखील धर्मग्रंथांची मागणी वाढेल असे दिसत आहे”.
आणखी वाचा :
नाशिकमधील रोड शो ते काळाराम मंदिरापर्यंत, पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास PHOTO