Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात पोहोचली कलश यात्रा, आता रामललांच्या मूर्तीची होणार स्थापना

| Published : Jan 17 2024, 07:31 PM IST / Updated: Jan 17 2024, 07:39 PM IST

Kalash Yatra Ram Temple
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात पोहोचली कलश यात्रा, आता रामललांच्या मूर्तीची होणार स्थापना
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात कलश यात्रा पोहोचली आहे. आता मंदिरामध्ये रामलला यांच्या मूर्तीची स्थापना होईल.

Ayodhya Ram Mandir : अयोध्येमधील भव्य श्री राम मंदिरामध्ये 22 जानेवारी रोजी रामलला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या सोहळ्यापूर्वी मंदिर परिसरात विशेष अनुष्ठान सुरू आहे. दुसरीकडे कलश यात्रा देखील बुधवारी (17 जानेवारी) राम मंदिरात पोहोचली आहे. आता मंदिरामध्ये रामलला यांची मूर्ती स्थापित करण्यात येईल. 

म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलेली रामलला यांच्या मूर्तीचे राम मंदिरात आगमन झाले आहे. आता या मूर्तीची मंदिरामध्ये स्थापना केली जाईल. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी करण्यात येणाऱ्या सात दिवसीय अनुष्ठानास मंगळवारी (16 जानेवारी) श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रचे सदस्य डॉ. अनिल मिश्र यांनी सुरुवात केली. मंगळवारी प्रायश्चित अनुष्ठान करण्यात आले. डॉ. अनिल मिश्र हे या वैदिक अनुष्ठानाचे यजमान आहेत. 

विशेष अनुष्ठानानुसार शरयू नदीमध्ये स्नान, पंचगव्यप्राशन आणि वाल्मिकी रामायणाचे पठण करण्यात आले. जलयात्रा, तीर्थपूजन आणि रामलला यांच्या मूर्तीचे भ्रमण यासारखे कार्यक्रम बुधवारी (17 जानेवारी) पार पडले. रामलला यांची नवीन मूर्ती वजनाने जड असल्याने 10 किलो वजनाची चांदीची मूर्ती पालखीमध्ये ठेवून शोभायात्रा काढण्यात आली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिवशी येणार अयोध्येत

श्री राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीला अयोध्येमध्ये दाखल होणार होते. पण सध्या हवामान खराब असल्याने पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आले आहेत. धुक्यामुळे विमान प्रवासामध्ये उशीर होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता पंतप्रधान मोदी 21 जानेवारीला अयोध्येमध्ये पोहोचतील. जेणेकरून नियोजित वेळापत्रकानुसार मंदिराचे कार्यक्रम पूर्ण होतील.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत मुख्य यजमान

मुख्य आचार्य आणि काशीचे प्रसिद्ध वैदिक विधी विद्वान पंडित लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षित यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अभिषेक अनुष्ठानाचे मुख्य यजमान असतील. विधीच्या संपूर्ण कालावधीसाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहू शकत नाहीत, म्हणून अन्य व्यक्ती यजमान म्हणून त्यांना मदत करतील".

आणखी वाचा

Ayodhya Ram Mandir : रामललांसाठी तयार केला तब्बल 1 हजार 265 किलोचा महाकाय लाडू, WATCH VIDEO

Ayodhya Ram Mandir : जय श्री रामाच्या जयघोषात 108 फूट लांब अगरबत्ती केली प्रज्वलित, अयोध्येत दीड महिने दरवळणार सुगंध

Ram Mandir Pran Pratishtha : पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीपर्यंत करतील केवळ फलाहार, या नियमांचं करताहेत पालन

Ayodhya Ram Mandir सोन्यासारखे चमकेल श्री राम मंदिर, नवीन फोटो पाहिले?

Read more Articles on