सार
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विधानसभेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासह देशातील चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे.
Assembly Election 2024 : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी विधानसभेच्या तारखांची घोषणा शनिवारी (16 मार्च) केली आहे. निवडणूक आयोगाकडून (Election Comission) आजवर 400 हून अधिक विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या आहेत. गेल्या सव्वा वर्षात 11 विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत 1.8 कोटी मतदार पहिल्यांदाच मतदान करणार असल्याची माहिती देखील राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेवेळी दिली.
कधी संपतोय चार राज्यांचा कार्यकाळ?
देशात चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे
- पहिल्या टप्प्यात 32 जागांसाठी सिक्कीम (Sikkim) येथील कार्यकाळ 2 जून, 2024 रोजी पूर्ण होणार आहे.
- दुसऱ्या टप्प्या 147 जागा असणाऱ्या ओडिशा (Odhisha) येथील कार्यकाळ 24 जून, 2024 रोजी पूर्ण होणार आहे.
- तिसऱ्या टप्प्यातील कार्यकाळ अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) असून तेथे 60 जागा आहेत असून तेथील कार्यकाळ 2 जूनला पूर्ण होणार आहे.
- चौथा टप्पा 175 जागांसाठीचा आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) असून तेथील कार्यकाळ 11 जून 2024 रोजी पूर्ण होणार आहे.
कोणत्या राज्यात कधी होणार निवडणूक?
आंध्र प्रदेशात 18 एप्रिलला परिपत्रक जारी केले जाणार असून 13 मे 2024 रोजी निवडणूक होणार आहे. येथे चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे.
ओडिशा येथे सहाव्या टप्प्यात 42 जागांसाठी निवडणूक होणार असून यासंदर्भातील परिपत्रक 29 एप्रिलला येणार आहे. येथे निवडणूक 25 मे रोजी होणार आहे. सातव्या टप्प्यात 42 जागांसाठी निवडणूक होणार असून यासाठीचे परिपत्रक 7 मे 2024 रोजी जारी केले जाणार आहे. येथे निवडणूक 1 जून 2024 रोजी होणार आहे.
अरुणाचल प्रदेशात परित्रक 20 मार्चला जारी केले जाणार असून 19 एप्रिलला निवडणूक होणार आहे. येथे निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे.
सिक्कीम येथे 20 मार्चला परिपत्रक जारी केले जाणार असून 19 एप्रिलला निवडणूक होणार आहे. येथे पहिल्या टप्प्यात निवडणूक होणार आहे.
आणखी वाचा :